गून्हाधार्मिकमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरातील दानपेटीतून पैशाची चोरी..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २३ मार्च २०२६ मंदिरातील
कर्मचाऱ्याचाच डल्ला; चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद, आरोपीला बेड्या ठोकल्या, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात चोरीची घटना उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंदिरातील कर्मचाऱ्यानेच या दान पेटीच्या पैशांवर डल्ला मारला आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली असून हि चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV) कैद झाली आहे. दरम्यान याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर काही लोक देखील या चोरी प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

चोरीच्या घटनेत आणखी ५-६ जणांचा सहभाग असल्याचा संशय, मुख्य आरोपीला अटक झाली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सिद्धीविनायक मंदिर पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून १० हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर प्रशासनाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला, परिणामी त्यांनी या गंभीर प्रकारची माहिती वरिष्ठांकडे दिली. त्यांनतर मंदिर प्रशासनाने मागील ८- १० दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्या नंतर याघटनेचं सत्य समोर आलं. येथील कामगारच चोरी करत असल्याची माहिती या सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आलीय. तर सातत्याने हा प्रकार घडत असल्याची माहिती आहे. या चोरीच्या घटनेत आणखी ५-६ जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. सध्या त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असून यातील मुख्य आरोपीला दादर पोलिसांनी अटक करत पुढील कारवाई सुरु केली आहे.

बोटाच्या कैचीने दानपेटीतून पैसे काढायचा, आरोपी कर्मचाऱ्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी.

दरम्यान, या चोरीच्या घटनेत कर्मचाऱ्याने बोटाच्या कैचीने पुजारी कक्षात असलेल्या दानपेटीतून पैसे काढत असल्याचे दिसून आलं आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने चोरीचाभांडाफोड झालाय. दरम्यान, आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ३ दिवसांची कोठडी सुनावली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. यातील कर्मचाऱ्याने गुन्हा कबूल केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सध्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? कर्मचारी या आधी देखील पैसे काढत होता का? त्याने पैसे काढले असतील तर त्याच्याकडे चोरीच्या पैशांची किती रक्कम जमा आहे? इत्यादी अनेक प्रश्न आता या निमित्याने उपस्थित केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!