गून्हापिंपरी-चिंचवडमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

घारगाव ता संगमनेर या ठिकाणी तमाशा कलावंत विठाबाई भाऊ नारायणगावकर तमाशा कलावंतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध:- युवराज दाखले

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. ०३ एप्रिल २०२६ विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळावर भ्याड हल्ला घारगाव ता.संगमनेर काही गावगुंड समाजकंटकांनी केला आहे शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने जाहिर निषेध..!

तमाशा कलावंतांवरचा भ्याड हल्ला
समाजाच्या विवेकाला प्रश्न..!

संध्याकाळच्या भाकरीची सोय करत असतांना या प्रवासात त्यांना सन्मान नाही तर भिती आणि अपमानच जास्त मिळतो.

फडातील गाड्या पेट्रोल पंपावर डिझेल भरत असतांना काही
समाजकंटकांनी गाडी आडवी लावून फडातील मुलींची छेड काढली.
त्यांना शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला परंतू उत्तर मिळालं भ्याडपणाचं- हल्ल्याच्या स्वरूपाने..

सदर प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. शासनाने कलावंतांच्या सुरक्षिततेच्या व सन्मानाच्या दृष्टीने पाऊल उचलले पाहिजे.
प्रश्न केवळ सुरक्षिततेचा नाही तर सन्मानाचा देखील आहे असं मत शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!