आर्थिकगून्हापिंपरी-चिंचवडपोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

निगडीतील हॉटेल व्यावसायिकाला मागितली १ लाखांची खंडणी; स्वयंघोषित ‘भाई’ला पोलिसांकडून अटक…

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०९ एप्रिल २०२६ निगडी परिसरातील यमुनानगर येथील एका हॉटेलमध्ये जाऊन शिवीगाळ करत १ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका २३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथील खान्देश तडका हॉटेलमध्ये आरोपी विशाल प्रल्हाद देवकर (वय ३२, रा. बोदवड, जि. जळगाव) हा आला. त्याने “मी गुन्हेगार आहे” असे म्हणत हॉटेलमध्ये शिवीगाळ केली आणि हॉटेल चालवायचे असल्यास १ लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास मारहाण करून हॉटेल तोडण्याची धमकीही दिली.
या घटनेप्रकरणी ०७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!