पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनला सारथीच नाही, किरकोळ तक्रारींचे सुद्धा निवारण होत नाही…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०९ एप्रिल २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या सारथी हेल्पलाइन वर नोंदवलेल्या किरकोळ तक्रारींचे सुद्धा निवारण होत नसल्याबाबत वेळोवळी कळवून देखील संबंधीत अधिकारी करतात टाळाटाळ.
सारथी हेल्पलाइनवर नोंदवलेल्या अगदी किरकोळ तक्रारींचे सुद्धा निवारण होत नसल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी कुदळवाडी येथील चेंबर तुंबलेले होती. या संदर्भात त्याच वेळी सारथी हेल्पलाइनवर तक्रार नोंदविण्यात आली. परंतु त्या तक्रारीचे निवारण न झाल्यामुळे दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी सारथी हेल्पलाइनला पुन्हा रिमाइंडर देण्यात आले तसेच महापालिका आयुक्त कार्यालयातील फोन क्रमांक ६७३३११०१ या क्रमांकावर सकाळी ११ वाजून ०२ मिनिटे आणि दुपारी ३ वाजून ३८ मिनिटे असे दोन वेळा संपर्क करून सारथी हेल्पलाइन वरील तक्रार टोकन क्रमांक 325359 बाबत माहिती देऊन सुद्धा या तक्रारीचे निवारण झालेले नाही त्यामुळे महापालिकेची सारथी हेल्पलाइन फक्त देखावा असल्याचे नागरिकांना वाटत आहे. तरी पालिका आयुक्त व महापौर यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होईल याची काळजी घ्यावी अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटने कडून सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक मिरगे यांनी निवेदना द्वारे सांगीतले आहे.



