गून्हाधार्मिकनाशिकमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

नाशिक मधील नामांकीत कंपनीत विनयभंग आणि धर्मांतरणाचा धक्कादायक प्रकार!..

देव नगरी नाशिक मधे नेमके चाललय काय?

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०९ एप्रिल २०२६ नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल झाले असून सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन महिला संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. न्यायालयाने पाच संशयितांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
​बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांविषयक असे प्रकार घडल्याने गांभीर्य वाढले आहे. या कारवाईची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. साधारणतः २०२२ ते २०२६ या कालावधीत हे गुन्हे घडले. यातील एक गुन्हा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाचा आहे, तर एक गुन्हा धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक अर्थात ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. तक्रारदारांमध्ये आठ महिला तर एका युवकाचा समावेश आहे. या युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!