उत्सवक्रीडापिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छा

छावा स्वराज्य सेना पिंपरी-चिंचवड शहर आयोजित “छावा करंडक २०२६” भव्य क्रिकेट टूर्नामेंट  स्पर्धा संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २० एप्रिल २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, संत तुकाराम नगर येथे छावा स्वराज्य सेना पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने “छावा करंडक २०२६” चे आयोजन दि. ११ एप्रिल ते १७ एप्रिल रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील तब्बल २२ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले.
छावा स्वराज्य सेना, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजित “छावा करंडक २०२६” हा भव्य क्रिकेट टूर्नामेंट अतिशय शानदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
स्पर्धेतील विजेते संघ:
०१ ) प्रथम क्रमांक: आयन इलेव्हन, अजम कॅम्पस पुणे
बक्षीस: २५,५५५ रोख रक्कम + ट्रॉफी
०२ ) द्वितीय क्रमांक: डीआयटी टायटन्स, डी वाय पाटील कॉलेज बक्षीस: १५,५५५ रोख रक्कम + ट्रॉफी
०३ ) तृतीय क्रमांक: दादा इलेव्हन, डी. वाय. पाटील कॉलेज पिंपरी
फक्त ट्रॉफी
पुरस्कार वितरण सोहळा:
प्रथम क्रमांकाचे बक्षीस पिंपरी-चिंचवड शहरातील युवा उद्योजक अमित दादा भोसले व विशाल भाऊ मासुळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक राम घायतिडक पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ व महिला प्रदेशाध्यक्ष शितलताई हुलवळे यांच्या हस्ते देण्यात आले.
तृतीय क्रमांक, तसेच मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर व मॅन ऑफ द मॅच पुरस्कार युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुशील कोटियन, सोमनाथ भाऊ पवार, प्रदीप दादा तरस व ठाणे जिल्हाध्यक्ष दीपक दादा शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ॲड. गणेश दादा कांबळे, सौरभ सगर, अतुल चव्हाण, शैलेंद्र पडवळ, विजय माने, किशोर चौधरी आदी पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे स्वागत पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अतुल चव्हाण यांनी केले.
मनोगत:
या स्पर्धेदरम्यान उद्योजक विशाल दादा मासुळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत स्पर्धेचे कौतुक केले.
प्रदेशाध्यक्ष राम पाटील यांनी सर्व संघांचे अभिनंदन करत सांगितले की “जिंकणे-हरणे हा खेळाचा भाग आहे. प्रत्येक सामना काहीतरी शिकवतो आणि पुढील यशाची वाट तयार करतो.”
खेळाडूंचा उत्कृष्ट सहभाग:
या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. विजयी संघाचे छावा स्वराज्य सेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन! करण्यात आले.
आयोजन:
या भव्य स्पर्धेचे यशस्वी आयोजन छावा स्वराज्य सेना विद्यार्थी संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष प्रतीक राजेंद्र पडवळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
तसेच प्रथमेश जाधव, दिनेश धोत्रे, स्वप्निल वाघमारे, खुशबीर माळी, गणेश खोकले, अवधूत कुंभार, धनंजय चौधरी, आदित्य मुटकुले, अभिषेक इंदापुरे, अभिषेक राऊत, दर्शन सोनवणे, संस्कार गायकवाड, शेखर शिंगाडे, अजिंक्य चव्हाण, अथर्व पडवळ आदी कार्यकर्त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला.
“छावा करंडक २०२६” फक्त एक स्पर्धा नसून, युवकांच्या एकतेचा आणि क्रीडा जिद्दीचा उत्सव आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!