अपघातमहाराष्ट्रमूंबई

पनवेल स्थानकात पहाटच्या सुमारास लिफ्ट कोसळल्याने मोठा अनर्थ!..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २१ एप्रिल २०२६ दैनिक वापरातील 4 प्रवास्यांना घेवून लिफ्ट कोसळली, यात ४ प्रवासी अडकल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पनवेल रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म ७ वरील लिफ्ट कोसळल्याने खळबळ उडाली. काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसच्या गर्दीत चार प्रवासी लिफ्टमध्ये अडकले. बचावकार्य सुरू असून रेल्वे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या प्रवाशांची लगबग सुरू असताना पनवेल रेल्वे स्थानकात धक्कादायक घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर बसवलेली लिफ्ट अचानक कोसळल्याने चार प्रवासी त्यामध्ये अडकले. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल आणि मेट्रो ट्रेनची ये-जा सुरू होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होती. दरम्यान, संबंधित लिफ्ट वरून खाली येत असताना अचानक नियंत्रण सुटून लिफ्ट कोसळली. लिफ्टमध्ये असलेले चार प्रवासी अडकून पडले. नेहमीप्रमाणे प्रमाणे निष्काळजीपणा म्हणावा लागेल जनतेच्या जिवाशी खेळ करणारे याला जबाबदार नाहीत का? उदया जीव गेला तर याला जबाबदार कोण???
असा प्रश्न जनतेला पडला आहे. रेल्वे मंत्री संबंधित अधिकारी व मेन्टेनन्स विभाग यांच्यावर कारवाई करणार का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!