अभिवादनउत्सवमहाराष्ट्र

आज १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त राष्ट्रीय संत मल्लिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे भव्य मिरवणूकीचे आयोजन..

प्रतिनिधी सोलापूर दि. ०१ मे २०२६ अखिल विश्वाला शांती, करूणा आणि मैत्रीचा संदेश देणारे महाकारूणिक तथागत भगवान बुध्द यांच्या बुद्ध जयंती निमित्त जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली (रजि) च्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री हवा मल्लिनाथ महाराज निरगुडी यांच्या दिव्य उपस्थितीत ऐतिहासिक भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय सदस्य तथा जेष्ठ समाजसेवी सिद्धार्थ तलवारे यांनी कळविले आहे.
आज शुक्रवार दिनांक १ मे २०२६ रोजी राष्ट्रीय संत मल्लिनाथ महाराज निरगुडी यांच्या दिव्य नेतृत्वाखाली ऐतिहासिक सोलापुर नगरीत सर्व धर्मीय देशवासीयांच्या उपस्थितीत महाकारूणिक तथागत भगवान बुध्द, समतेचे महान पुरस्कर्ते महात्मा बसवेश्वर महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येईल.
  सोलापूर शहरातील पार्क चौकातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला श्री हवा मल्लिनाथ महाराज निरगुडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीस सुरुवात होईल त्यानंतर डफरीन चौक मार्गे कामत हाॅटेल चौक,व्हिआयपी रोड, संगमेश्वर काॅलेज, सात रस्ता चौक येथून मार्गक्रमण करत मुख्य कार्यक्रम स्थळ असलेल्या गांधीनगर येथील हेरिटेज लाॅन येथे राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत प्रमुख वक्ते मार्गदर्शन करतील असे सिद्धार्थ तलवारे यांनी कळविले आहे.
चौकट
राष्ट्रीय संत श्री हवा मल्लिनाथ महाराज यांनी स्वतःला कोणत्याही मठापुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण देश आपला मठ आहे असे समजून देश बळकट करण्याचे काम ते अहोरात्र करत आहेत. देशात राष्ट्रीय एकात्मता मजबूत होण्यासाठी संविधानिक कर्तव्याची जाणीव देशातील नागरिकांना करून देण्यासाठी सतत देशात विविध ठिकाणी देशभक्ती कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात, आणि देशभर फिरून देश आणि समाज घडविण्याचे काम करत आहेत.
श्री हवा मल्लिनाथ महाराज यांनी वयाच्या नवव्या वर्षी गृहत्याग करून हातात तिरंगा आणि संविधान घेऊन भारतभर फिरून देशभक्त निर्माण करणारे दुर्मिळ राष्ट्रीय संत आहेत
   सिद्धार्थ तलवारे -राष्ट्रीय सदस्य -जय भारत माता सेवा समिती नवी दिल्ली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!