
प्रतिनिधी पूणे दि. ०१ मे २०२६ बुधवार दि.२९ एप्रिल २०२६ रोजी शिक्षण हक्क मंच पुणे यांच्या तर्फे अल्पसंख्याक समाजाचे नेता राजन नायर, फिरोज मुल्ला सर, (रिपाई खरात गट पक्षाचे प्रदेश प्रमुख) व चांदभाई बेलबट्टी शेख (जिल्हाध्यक्ष शिक्षण हक्क मंच) यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उपायुक्त मा. वसुंधरा बर्वे यांची भेट घेऊन पुणे महानगरपालिकेच्या अधिनस्त असलेला प्राथमिक व माध्यमिक अल्पसंख्याक शाळांच्या पायाभूत सुविधा, शिक्षक कमतरता, सुरक्षा व्यवस्था, सिसिटिव्ही कॅमेरा, शुद्ध व स्वच्छ पाण्याची सोय, स्वच्छ व हवेशीर वर्ग, डिजिटल शिक्षण आणि अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या चर्चेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटचे महाराष्ट्र राज्याचे संघटक फिरोज मुल्लासर यांनी सर्व मुद्दे त्यांच्या समोर ठेवून ते समजावून लगेच कार्यवाही करण्यासाठी लक्ष वेधले. मा. शिक्षण उपायुक्त यांनी सर्व मुद्दे ऐकून प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले व सकारात्मक माहिती दिली.
त्याचबरोबर मा. शिक्षण उपायुक्त यांच्या सोबत चर्चा करताना अल्पसंख्याक समाजाचे नेते, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे श्री. राजन नायर यांनी अल्पसंख्याक समाजाबाबत होत असलेला भेदभाव, पालिकेच्या शैक्षणिक खात्याकडून, व महाराष्ट्र सरकार कडून होणारा भेदभाव याबाबत मुद्दा उचलला आणि २०२१ च्या शैक्षणिक धोरणानुसार सर्व भाषांना सन्मान देण्याचा निर्णय, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि सर्व प्रादेशिक भाषा अमलात आणण्यासाठी लक्ष केंद्रित केले तसेच मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेला कोठारी आयोग, सच्चर आयोग,
रंगनाथन मिश्रा कमिटी बाबत बोलत असताना, मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजात मुस्लिम समाज शैक्षणिक क्षेत्रात मागे आहे त्यांना पुढे आणण्याचे काम हे इतर समाजाचे दायीत्व आहे. विशेषतः शिक्षण विभागाचे आहे. पुढे चर्चेत बोलत असताना सुरक्षा, सिसिटिव्ही, शुद्ध व स्वच्छ पाण्याची सोय, हवेशीर वर्ग, दर्जेदार शिक्षण हे शिक्षण हक्क कायदा व भारतीय संविधानाच्या कलमांनुसार अधिकार आहे.
देशाची उन्नती तरूणांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार शिक्षणावर अवलंबून आहे. सर्व समाजाची शैक्षणिक उन्नती म्हणजेच देशाची उन्नती असे मा. राजन नायर यांनी सांगितले यासाठी प्रत्येक समाजाने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.
या सर्व मुद्द्यांवर विचार विनीमय होत असताना मा. शिक्षण
उपायुक्त यांनी सांगितले की, कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांची भरती या मे महिन्यात करण्यात येईल व सुरक्षा व्यवस्था कडे लक्ष देण्यात येईल व नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अगोदर सर्व शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, सुरक्षा व्यवस्था यांच्या सोबत एक मिटींग घेऊन उपायुक्त, पालिका अधिकारी व शैक्षणिक दर्जा ही सर्व जबाबदारी माझ्या वर आहे या नात्याने सर्वांशी संपर्क करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांच्या या नम्र व प्रामाणिक पणा मुळे पुणे शिक्षण हक्क मंचचे जिल्हाध्यक्ष मा. चांदभाई बेलबट्टी शेख व त्यांच्या टिम व्दारा मा. शिक्षण उपायुक्त यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या हलिमा ताई शेख, रिपाई खरात गटचे शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष संदिप शडगे, दौलतभाई पिरजादे, शिक्षण हक्क मंचचे आय टी विभागाचे संयोजक सारा सौदागर, प्रहार संघटनेचे नौशाद शेख व इतर ही असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



