पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरात विषारी मद्य प्राशनाने अनेकांचा मृत्यू संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० मे २०२६ वरिल विषया संदर्भात पिंपरी चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. व पोलीस प्रशासनाचा गलथान कारभार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
तसेच सदर घटनेची दखल घेत आज दापोडी पोलीस ठाणे येथे भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली. तसेच या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला शासन झाले पाहिजे अशी मागणी केली.
सदर घटनेत सत्ताधारी भाजप सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळेच ही घटना घडली. शासनाच्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आज सायंकाळी ५.०० वाजता आम्ही आंदोलन करणार आहोत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मयूर जाधव, कल्पनाताई घाडगे, युवक विधानसभा अध्यक्ष ॲड. संतोष शिंदे सरचिटणीस रजनीकांत गायकवाड, वसीम पठाण, विद्यार्थी विधानसभा अध्यक्ष रिषभ भाडाळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



