पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त यांना सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांचे निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३० मे २०२६ आयुक्त साहेब आपण एक तेजस्वी पोलिस अधिकारी आहात राष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी शोध आणि गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी आपले संपूर्ण देशात IPS अधिकाऱ्यांमध्ये नाव आहे, परंतू सर आपल्या अधिनस्त असलेले पिंपरी चिंचवड शहरांमधील उप-आयुक्त, सहाय्यक आयुक्त, सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याना आपण पोलिस आयुक्त या नात्याने सक्रिय होण्यासाठी आदेश द्यावा, कारण ह्या दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात खूपच मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे, Murder, कोयता गँग, गोळीबार, दारू विक्री, विविध प्रकारच्या नशा, वाहनांची तोडफोड, चोरी, महिलांवर अत्याचार आणि असे विविध प्रकारची गुन्हेगारी वाढत चाललेली आहे म्हणून आदरणीय सर आपण अशा समाजाला घातक असलेल्या गोष्टींच्या बाबत लक्ष द्यावे व पिंपरी चिंचवड शहर हे भयमुक्त, गुन्हेगारी मुक्त शहर बनविण्यासाठी आपण या संदर्भात लवकरात लवकर कडक निर्णय घ्यावे अशा स्वरूपाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते राजन नायर यांनी काल पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालय येथे दिले.
यावेळी ते बोलले की पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती पाहता आपण उप-आयुक्त, सहाय्यक आयुक्त, गुन्हे अन्वेषण अधिकारी आणि सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक व सर्व गुन्हे शाखेचे, युनिटची, मिटींग घेऊन याबाबत चर्चा करून त्वरित कार्यवाही करून गुन्हेगारी मुक्त शहर करावे.



