आरोग्यपाणीबानीमहाराष्ट्रमूंबईविशेषसामाजिक

!!…१०० कोटी मालमत्ता कर वसुली… मग झाडांसाठी पाण्याची व्यवस्था कधी..?!!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०२ जून २०२६ नवी मुंबई महानगरपालिकेने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच तब्बल १०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. कर वसुलीबाबत प्रशासनाकडून यशस्वी कामगिरीचे कौतुक होत असताना दुसरीकडे शहरातील काही भागांमध्ये झाडे पाण्याअभावी सुकत असल्याचे चित्र नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.
तुर्भे गाव तलाव परिसरातील अनेक झाडे सध्या ४१ ते ४२ अंश तापमानाच्या तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. तलावात वर्षभर पाणी उपलब्ध असतानाही झाडांसाठी कायमस्वरूपी सिंचन व्यवस्था नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न सरळ आहे…
“१०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल होऊ शकतो, फॉर्मुला रेससाठी कोट्यवधी रुपयांची कामे होऊ शकतात, मग झाडांना पाणी देण्यासाठी एक मोटर आणि काही मीटर पाइपलाईन का उभारली जात नाही?”
पर्यावरणप्रेमींच्या मते, तलावातून मोटरच्या सहाय्याने पाणी उचलून साधी पाइपलाईन किंवा ठिबक सिंचन व्यवस्था केल्यास शेकडो झाडे वाचू शकतात. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता नसतानाही प्रश्न प्रलंबित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणा फक्त फलकांपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्या पाहिजेत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबईची ओळख ही केवळ विकासकामे, उंच इमारती आणि मोठे प्रकल्प यांमुळे नाही, तर शहराच्या हिरवाईमुळेही आहे. त्यामुळे महसूल वसुलीबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
सदर माहिती : शरद अनंत पाटील
मी नवी मुंबईकर यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!