
राकेश मनोज बेदी कॅनडामध्ये दाखवणार आपला दम; फडकवणार तिरंगा
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १३ जून २०२६ भारतीय नौदलाच्या (पश्चिम नौदल कमांड) मुंबई विभागात कार्यरत असलेले राकेश मनोज बेदी यांनी पुन्हा एकदा आपल्या क्रीडा नैपुण्याची चुणूक दाखवली आहे. आगामी ‘ऑन्टारियो समर गेम्स’ (३० जुलै ते ०२ ऑगस्ट २०२६, टोरंटो, कॅनडा) साठी भारतीय राष्ट्रीय वूशू संघात राकेश यांची निवड झाली आहे. ते ७५ किलो सांडा वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
फेब्रुवारी २०२६ मध्ये डेहराडून येथे झालेल्या ‘वूशू असोसिएशन ऑफ इंडिया’च्या निवड चाचणीत राकेश यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघात आपले स्थान निश्चित केले. राकेश यांनी यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी अनेक पदके जिंकून देशाला गौरवास्पद कामगिरी करून दिली आहे.
५ वी ॲक्रोपोलिस वूशू इंटरनॅशनल, अथेन्स (ग्रीस) रौप्य पदक
बाटुमी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप, जॉर्जिया: कांस्य पदक
७ वी नॉर्डिक वूशू चॅम्पियनशिप, स्टॉकहोम (स्वीडन) कांस्य पदक
९ वी आशियाई चॅम्पियनशिप, अम्मान (जॉर्डन) आशियामध्ये ५ वा क्रमांक
सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप: सुवर्ण पदक (भारतीय नौदल)
विश्व चॅम्पियनशिपमध्ये सहभाग यूनान
राकेश यांच्या या निवडीमुळे त्यांच्या मूळ उरण (रायगड , नवी मुंबई , महाराष्ट्र ) येथे आनंदाचे वातावरण आहे. गावकरी आणि चाहत्यांनी त्यांना या यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या पुढील वाटचालीस उज्ज्वल भविष्य मिळो, अशी प्रार्थना केली जात आहे.
या यशाचे श्रेय देताना राकेश मनोज बेदी यांनी पश्चिम नौदल कमांड (WED मुंबई) मधील सर्व वरिष्ठ अधिकारी, नौदल मुख्यालय (दिल्ली – DCP), वूशू असोसिएशन ऑफ इंडिया आणि राजीव लोचन, साईं गणेशन, सुबोध यादव, पीएन मोरे, डॉ. रविंद्र सिंह (भोलू)-खरक कलां, विनोद पैलवान, संजय (संजू पैलवान), सरपंच राजकुमार, सरपंच निट्टू पैलवान, नफे सिंह प्रधान, जोगिंदर पैलवान कलानौर, अजय कुमार, सुरेश डोभाल, प्रीतम जे म्हात्रे (दादा) , जाह्नवी भोईर, दादी सती जाबदे कुस्ती आखाडा आणि आपल्या प्रशिक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि पाठिंब्याशिवाय हे यश मिळवणे शक्य नव्हते, असे राकेश यांनी सांगितले.
संपूर्ण देश आणि भारतीय नौदल राकेश यांना आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहे.
आगामी ओंटारियो समर गेम्ससाठी अनुवाद आपला न्यूजच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, राकेश जी!



