अभिनंदनउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रमूंबई

पल्लवी पाटील यांची जागतिक स्तरावर गगनभरारी! न्यूझीलंडमध्ये करत आहेत अणुविज्ञानात भारताचे प्रतिनिधित्व!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १४ जून २०२६ अलिबागच्या आगरी कोळी समाजाच्या आणि ‘NP Healthcare’ च्या संचालिका पल्लवी राजाराम पाटील यांनी वैद्यकीय आणि अणुविज्ञान (Nuclear Science) क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. आज, १३ जून २०२६ रोजी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे आयोजित ‘Inaugural Women in Nuclear Symposium 2026’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्या भारताचे अत्यंत अभिमानाने प्रतिनिधित्व करत आहेत. महिलांना अणुविज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी पल्लवी पाटील एक मोठे पाऊल उचलणार असून, भारतात लवकरच ‘WIN (Women in Nuclear Medicine) India’ या संस्थेची स्थापना करण्याचे त्यांनी योजिले आहे.
विशेष म्हणजे या आगामी संस्थेला ‘IAEA’ (International Atomic Energy Authority) या जागतिक संस्थेची अधिकृत मान्यता असणार आहे. पल्लवी पाटील यांच्या या उत्तुंग यशामागे त्यांचे सखोल ज्ञान आणि मोठी शैक्षणिक तपश्चर्या आहे. त्यांनी ‘B.Sc. Chemistry’ आणि ‘MBA in Healthcare Administration’ चे शिक्षण पूर्ण केले असून, ‘BRIT’ (Board of Radiation and Isotopes India) कडून ‘Radio Immuno Assay’ कोर्सचे विशेष प्रमाणिकरणही प्राप्त केले आहे. “महिलांचे सक्षमीकरण, अणुविज्ञानाची प्रगती आणि आरोग्यसेवेत परिवर्तन” या मुख्य ध्येयाने प्रेरित असलेली पल्लवी यांची ही वाटचाल संपूर्ण देशासाठी आणि विशेषतः अलिबागकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!