पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासन कडून अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या असंविधानीक विषयांबाबत सामाजिक कार्यकर्ते राजन नायर आक्रमक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ जून २०२६ अखिल भारतीय काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष आणि मुंबई व महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी माननीय अहमद खान साहेब यांच्याशी अल्पसंख्याक समाजाच्या विविध मुद्द्यांवर, तसेच अल्पसंख्याक राज्य समितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान, सामाजिक कार्यकर्ते व ख्रिश्चन समाजाचे नेते राजन नायर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी मशीद, बुद्ध विहार व अल्पसंख्याक धार्मिक स्थळांवर केलेल्या बेकायदेशीर कारवाई बाबत लक्ष वेधले व या बाबतीत अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा सदस्य माननीय इम्रान प्रतापगढी व देशाचे नेते व लोकसभा विरोधी पक्ष नेते श्री. राहुलजी गांधी यांच्या समोर हा मुद्दा ठेवून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांनी अल्पसंख्याक समाजावर असंविधानीक रितीने केलेल्या अन्यायाबाबत तोडगा काढून त्यावर उपाय योजना करण्यासाठी सचोटीने प्रयत्न करील असे आश्वासन दिले.
या भेटी दरम्यान श्री. राजन नायर, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. अहमद खान यांच्या समोर पिंपरी चिंचवड अल्पसंख्याक समाजात सध्या तणावाचे वातावरण आहे.
अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे याबाबत अल्पसंख्याक विभागाने काळजी पूर्वक लक्ष द्यावे. अशा स्वरूपाची विनंती केली..



