
विशेष प्रतिनिधी नवनाथ बी. सोनवणे बारामती दि. १७ जून २०२६ अखिल मराठी साहित्य सांस्कृतिक कला व आरोग्यदायी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व लिंबराज फिल्मस बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौदावे शिव शाहू फुले आंबेडकर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले असून या साहित्य संमेलनाचे मुख्य आयोजक,माननीय डॉ. बी.डी.गायकवाड यांनी पत्राद्वारे माहिती कळविण्यात आली आहे.
प्रमुख उपस्थिती, माननीय श्री.शरदचंद्र पवार साहेब (खासदार माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष) हे प्रामुख्याने उपस्थित राहनार आहेत. त्यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
या साहित्य संमेलनाचेअध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस( ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक )स्वागताध्यक्ष मा. डॉ संतोष मचाले प्रमुख पाहुणे माननीय श्रीनिवास पाटील साहेब (माजी खासदार सातारा मा. राज्यपाल सिक्कीम मा. जिल्हाधिकारी ) पुणे तसेच धैर्यशील मोहिते पाटील (खासदार माढा ) सुप्रियाताई सुळे (खासदार बारामती ) ओमराजे निंबाळकर (खासदार धाराशिव ) रोहित दादा पवार (आमदार कर्जत जामखेड ) दत्ता मामा भरणे (कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य ), मेघराज राजेभोसले (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ), प्रकाशजी धोत्रे (ज्येष्ठ सिने अभिनेते ), सुरेखा पुणेकर (ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सिने अभिनेत्री ), प्राजक्ता गायकवाड ( छत्रपती संभाजी महाराज मालिका.सिने अभिनेत्री ), रूपाली पवार (बॉलीवूड सिनेमा अभिनेत्री) हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार असून या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत विविध क्षेत्रातील अॅड. जयश्री सोनवणे (रणरागिनी प्रेरणा पुरस्कार ) पत्रकार निवेदक रानकवी जगदीप वनशिव माणदेश कविवर्य डॉ. लक्ष्मण हेंबाडे (संत चोखो मेळा साहित्य गौरव पुरस्कार ), राहुल रामचंद्र जाधव (ज्येष्ठ छायाचित्रकार संस्कृती पुरस्कार ), दत्तात्रय निकाळजे (वृक्षवल्ली संत तुकाराम गौरव पुरस्कार ), ज्ञानेश्वर शेळवणे (संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर साहित्य गौरव पुरस्कार ), डॉ सुनिता धर्मराव (साहित्य रत्न पुरस्कार ), नवनाथ सोनवणे (उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार ), मान्यवरांना साहित्य संमेलन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत येत्या जुलै महिन्यात साहित्य संमेलनात कवी संमेलन कथाकथन परिसंवाद अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यमंदिर प्रशासकीय भवन येथे साहित्य संमेलन संपन्न होईल…



