अभिनंदनउत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

स्वामी सीएनजी हायड्रो टेस्टिंग प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी मधु ताराची प्रमुख उपस्थिती.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑगस्ट २०२६ काल दि. १५ रोजी भूमकर चौक चिंचवड पुणे येथील रिक्षा चालक श्री मधुकर यादव सर यांच्या सी एन जी हायड्रो टेस्टिंग प्लांटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या वेळी अनेक वर्ष रिक्षा व्यवसाय करून आज परिवाराच्या साथीने आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आपल्या या प्लांटच्या माध्यमातून रिक्षा चालकांना कमी दरात हायड्रो टेस्टिंग करून देण्यासाठी व्यावसायिक पाऊल टाकणारे श्री यादव यांचा मधु तारा प्रमुखांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचेत सन्मान केला.
श्री यादव यांना त्यांच्या नवीन व्यवसायाबद्दल हार्दिक शुभेच्छा देत परिवार जर सोबत असेल तर अशक्य ही शक्य होते व अशा गोष्टी घडू शकतात असे म्हणत श्री शिंदे यांनी यादव यांचे मेहुणे आणि पार्टनर श्री अमित देवकर. श्री मयूर यादव. श्री गौरव यादव यांचे ही अभिनंदन केले.
या वेळी छावा वाहन चालक मालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सोमनाथ भाऊ कलाटे, उपाध्यक्ष श्री लक्ष्मण भाऊ शेलार, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री हिरामण गवारे, काळूबाई रिक्षा स्टँड हिंजवडी अध्यक्ष श्री रुपेश भाऊ गुटकुले, श्री सलीम भाई सय्यद तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button