अभिवादनअमरावतीउत्सवदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

आंबेडकरी काव्य गझल मुशायरा थाटात संपन्न..

देशाभिमान, भारतीय संविधान आणि मानवतावादी काव्य गझलचे सादरीकरण

प्रतिनिधी अविनाश गोंडाणे अमरावती दि. १७ ऑगस्ट २०२६ स्वतंत्रता दिवस आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त, तथागत टी. व्हि.चॅनल अमरावती (महाराष्ट्र ) द्वारा, आंबेडकरी काव्य गझल मुशायराचे आयोजन, अजिंठा सभागृह तक्षशिला महाविद्यालय परिसर काँग्रेस नगर रोड अमरावती येथे १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
             आंबेडकरी काव्य गझल मुशायराचे अध्यक्ष शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे, स्वागताध्यक्ष विद्रोही अविनाश गोंडाणे, प्रमुख पाहुणे प्रा.देवानंद पाटील, अरुण वानखडे (मुख्य संचालक तथागत टी. व्हि.), पद्माकर मांडवधरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आंबेडकरी काव्य गझल मुशायऱ्यात प्रख्यात कवी दिनकर मडकवाडे यांनी,
“लटकवा फासावर लिहिणे सोडणार नाही”
“विश्वास श्वासावर जगणे सोडणार नाही”
    अशी भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची महती सांगणारी कविता सादर केली. गझलकार सैयद अली यांनी, ” ऐ मेरे प्यारे वतन.. देशाभिमानाला उजागर ” करणारी गझल सादर केली. कवी एम. बी. बागडे यांनी, ” सारेच म्हणतात फुले, शाहू, आंबेडकरांचे आम्ही ” अशी विचाराधीन कविता सादर केली. कवी प्रा. अरुण बुंदेले यांनी  “पंधरा ऑगस्ट नावाची ” कविता सादर केली. प्रा.डाॅ.अजय खडसे यांनी “खोडा”नावाची कविता सादर केली तर रिजवान शेख यांनी, “एक इंसान” भास्कर बसवनाथे यांनी “चुनाव आया है”, कवयत्री पद्मा घरडे यांनी “कुंकू रमाईच” ही कविता सादर केली, वनदेव मोहोड यांनी “युवा पिढी”, डॉ.विजय वडगावकर यांनी “बाराच्या भावात” तर मधु हिरेकर यांनी “विचाराचे दान” कविता सादर केली, गोवर्धन रामटेके यांनी, “बाबासाहेब जगात एक नंबर”, कवी हिवराळे यांनी “कुठे चाललो आम्ही”, गझलकारा नर्गिस अली यांनी, “आज भी महफुज है दिल के मेहराब में…
उसने दी थी निशाणी मौसमे बरसात में “! ही हृदयाला भिडणारी गझल सादर केली. कवयत्री प्रेरणा पांडे यांनी “माणूसकी” नावाची कविता सादर केली. कवी पवन डोंगरे यांनी “संविधानाच्या बळावर” ही कविता सादर केली. स्वागताध्यक्ष विद्रोही अविनाश गोंडाणे यांनी,”मौत मंजिल मगर रहगुजर जिंदगी “
“हर कदम हो रही मुख्तसर जिंदगी .” अशी मानवाच्या खडतर जीवनाला अधोरेखित करणारी जिंदगी नावाची गझल सादर केली. प्रमुख पाहुणे प्रा.पदमाकर मांडवधरे यांनी “राजधानी” तर प्रा.देवानंद पाटील यांनी “एकीचे बळ” ही कविता सादर केली. आंबेडकरी काव्य गझल मुशायराचे अध्यक्ष शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांच्या “आझाद भारत के लोग संविधान पढेंगे”
“धर्म ग्रंथो की शर्त छोड संविधान को श्रेष्ठ कहेंगे” या आशयपूर्ण कवितेने आंबेडकरी काव्य गझल मुशायराची सांगता झाली. संचालन पवन डोंगरे (राष्ट्रीय निवेदक )यांनी केले तर आभार सुनीता रायबोले यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button