मधु ताराच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया..

प्रतिनिधी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ काल दि. १६ सप्टेंबर रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीमती रुक्मिणी तुकाराम जाधव वय वर्ष ७७ राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि श्रीमती राजकुमारी ओमप्रकाश तिवारी वय वर्ष ६५ राहणार निवासा सोसायटी पेरणे गाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांचे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आले.
ही शस्त्रक्रिया द. मेन्स ब्लाइंड असोसिएशन एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे येथे प्रकल्प समन्वयक श्री. दिनेशजी रावळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दिनांक १२ सप्टेंबर रोजी झालेल्या मधु तारा फाऊंडेशन आणि आर. पी. आय. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. संतोषजी खरात यांचे वडील कै.भीमराव लेना खरात यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या भव्य नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या मध्ये ज्यांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नावे रजिस्टर करण्यात आलेल्या १३ लाभार्थी गरजू रुग्णांना या शस्त्रक्रियाचा लाभ मिळाला.
या वेळी मधु ताराच्या हवेली तालुका महिला अध्यक्षा स्वरणलता ताई ननावरे आणि उपाध्यक्षा वैष्णविताई जाधव यांनी रुग्णांसाठी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी शस्त्रक्रिया लाभार्थी श्रीमती रुक्मिणी तुकाराम जाधव आणि श्रीमती राजकुमारी ओमप्रकाश तिवारी यांनी मधु ताराच्या सेवेबद्दल आनंद व्यक्त करत मधु ताराला अनेक आशीर्वाद दिले.
या वेळी मधु तारा प्रमुख श्री. नितीनजी शिंदे यांनी समाजातील अनेक संस्था तसेच राजकीय पक्ष यांनी मधु तारा सोबत राहून सामाजिक कार्यात सहभागी होऊन तळागाळातील नागरिकांसाठी शिबिर आयोजित करून शासकीय योजनेच्या अंतर्गत आरोग्यासाठी पुढाकार घ्यावा.



