अभिवादनउत्सवदेश-विदेशधार्मिकपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसन- उत्सवसामाजिक

बेडसे लेणी व मॉनेस्ट्रीमध्ये “महा मंगल मैत्री सोहळ्याचे” आयोजन..

प्रातिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ सप्टेंबर २०२६ वर्षावास, भाद्रपद पौर्णिमा व जागतिक पर्यटन दिनानिमित्त स्वाभिमानी प्रतिष्ठान आदर्श नगर मोशी यांच्या संकल्पनेतून व बोधीचित्त ज्ञान बुद्धिस्ट मॉनेस्ट्री यांच्या सहकार्याने तसेच वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी बेडसे लेणी वर व मॉनेस्ट्रीमध्ये “महा मंगल मैत्री सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे. तसेच मॉनेस्ट्रीमध्ये २६ तारखेला संध्याकाळी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त परित्राण पाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात खास करून पाच ते पंचवीस वयोगटातील बालमित्रांसाठी धम्म लेणी अभ्यास कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यामध्ये, बुद्ध वंदना, भंतेजीशी संवाद, धम्म देसना, लेणी वर प्रश्न उत्तराचा कार्यक्रम, पंचशील रॅली, वृक्षारोपण, बालमित्रांचे मनोगत होणार आहे. येताना तळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगलो स्मारक येथे भेट देणार आहोत. तरी जास्तीत जास्त पिंपरी चिंचवड मधून बालमित्रांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य समन्वयक धम्म सेवक राजू कांबळे, तसेच आदरणीय भदंत बुद्धघोष महाथेरो, समन्वयक बुवासाहेब अहिवळे गुरुजी व अध्यक्ष नरेंद्र प्रगणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button