
प्रतिनिधी हडपसर पुणे दि. १९ सप्टेंबर २०२६ काल दि. १८ रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. नितीनजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री. अनिलजी दांगडे आणि आर. पी आय. हडपसर विधानसभा अध्यक्ष तसेच आदर्श युवक मित्र मंडळाचे आधार स्तंभ प्रमुख सल्लागार श्री. संतोषजी खरात यांच्या नियोजनातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदर्श युवक मित्र मंडळ भैरवनाथ चौक गडगोबा मंदिर माळवाडी हडपसर येथे राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
गणेशोत्सवात लोकहिताचे कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल कृषी मंत्री यांनी मधु तारा फाऊंडेशन आणि आदर्श युवक मित्र मंडळ यांचे अभिनंदन केले.
द.ब्लाइंड मेन्स असोसिएशन एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे प्रकल्प समन्वयक श्री. दिनेशजी रावळ सर यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या शिबिरास अनेक वयोवृद्ध तसेच दिव्यांगांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी अनेक नागरिकांची नावे रजिस्टर करण्यात आली.
यावेळी आदर्श युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष आकाश निकाळजे, उपाध्यक्ष गोरख लोंढे, कार्याध्यक्ष शुभम राख, खजिनदार राकेश उत्तपुरे, विशाल आकरे, उप खजिनदार, अभिजीत निकाळजे, रोशन सोनकांबळे, मेघराज शितोळे, उत्सव प्रमुख सचिन आबनावे, अभिजित रणदिवे, विकास निकाळजे, हिशोब तपासणीस सचिन साळवे, सचिन घोळवे, दीपक मोरे, चिटणीस दीपक पवार, दुर्गेश मोरे, अजिंक्य पाचकुडवे, मिरवणूक प्रमुख नवनाथ लोंढे, सचिन फुले, गणेश जगदाळे, प्रीतम पाटील, कार्यकारणी सदस्य प्रणव कदम, ऋषभ कुकनूर, किरण भाले, सोनू शिर्के यांनी शिबिर नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.



