शहरसामाजिक

चिंचवड मधे होतोय लावणी महोत्सव सूरू आमदार उमा खापरे, माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे व सूरेखा पूणेकर यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती..

पिंपरी, लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच २५ आणि २६ मार्चला राज्यस्तरीय भव्य महालावणी स्पर्धा होणार आहे. एका पेक्षा एक जबरदस्त लावण्या पाहण्याची संधी शहरातील लावणी प्रेमींना मिळणार आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
स्पर्धेतील पहिले पारितोषिक 1 लाख रुपयांचे
असणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राची लावणीची परंपरा जपणाऱ्या कलाकारांचा विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. याबाबतची माहितीकार्यक्रमाच्या आयोजक आमदार उमा खापरे, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे व सूरेखा पूणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटन कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपात यांच्या हस्ते होणार आहे. पत्रकार परिषदेस लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यावेळी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!