जिंती येथे खा.श्रीनिवास पाटील साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजिवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी मंत्री मा.विक्रमसिंहजी पाटणकर-दादा आणि सारंग पाटील-बाबा यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनीधी – सागर पाटील
पाटण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले जिंती ,जितकरवाडी, माईगडेवाडी, गणेशवाडी, भातडेवाडी,हौदाचिवाडी,नवीवाडी, नळ योजना करणे कामी 1 कोटी 44 लाख रुपये, तसेच सावंतवाडी, बौद्धवस्ती नळ योजना करणे 22 लाख 32 हजार रुपये मोडकवाडी,हेळोबाचीवाडी नळ योजना 22 लाख 42 हजार रुपये एवढा मोठा निधी
खा.श्रीनिवास पाटील साहेबांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजिवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी मंत्री मा.विक्रमसिंहजी पाटणकर-दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.सारंग पाटील-बाबा यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.
याप्रसंगी प्रतापराव देसाई-भाऊ, रघुनाथराव जाधव-तात्या, कराडच्या गटविकास अधिकारी श्रीमती मीनाताई साळुंखे, दिलीपराव कोळेकर, पोपटराव खेडेकर, सचिन जाधव, अंकुश मोंडे, सुरेश मत्रे-दादा, सुभाष पाटील, अक्षय बडेकर, श्री.सचिन वाघमारे, अण्णा लोहार, महेश चव्हाण, सरपंच दामाजी कदम, उपसरपंच उमेश चव्हाण, जयवंत पाटील, अन्य मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा, सारंग बाबा यांनी दिली.



