आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

प्रा. बी. बी. शिंदे यांनी अमरण उपोषणाचे हत्यार केले म्यान.. पण साखळी उपोषणावर लावणार बोलले ध्यान..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२५ नोव्हेंबर २०२३ रमाई आवास योजना अंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रा. बी. बी. शिंदे, लक्ष्मण शिरसाट, सुनिता ताई कांबळे, शालन ओव्हाळ, दिलीप बनसोडे यांनी अमरण उपोषण प्रशासनाच्या विरोधात गेली तीन दिवस सूरू ठेवले होते, अमरण उपोषण कर्त्यांनपैकी एक जनाची (दिलीप बनसोडे यांची) परवा २२ तारखेला रात्री तब्येत खालावली असल्याने त्यांना तातडीने वाय. सी. एम. रूग्णालयात दाखल करण्यात आले‌ होते.

उपोषण सूरू असताना चौथ्या दिवशी प्रा. बी. बी. शिंदे व इतरांची तब्येत खालावत चालली होती यांचे गांभीर्य लक्षात घेवून पिंपरी चिंचवड काॅंग्रेस अध्यक्ष तसेच कामगार नेते कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ कोर कमिटी सदस्य देवेंद्र तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्य सचिव राजन नायर, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा सकल मातंग समाज समन्वयक लोकसेवक युवराज दाखले यांनी सहायक आयुक्त जांभळे पाटील, उल्लास जगताप व प्रभाग अधिकारी तथा सहायक अतिरिक्त आयुक्त आण्णा बोदडे तसेच समाज कल्याण विभागाचे उपायुक्त लोंढे यांच्याशी सकारात्मक चर्चा करून आयुक्त शेखर सिंग प्रदेश दौर्‍यावरून २९ किंवा ३० नोव्हेंबर २०२३ ला आल्या नंतर तात्काळ समितीची बैठक लावून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असा विश्वासनीय शब्द व लेखी पत्र समाज कल्याण विभागाचे उपायुक्त लोंढे यांनी दिल्या नंतर अमरण उपोषण काही काळ स्थगित करण्यात आले.
पण साखळी उपोषण पूढे नव्याने सूरू करत आहोत जोपर्यंत आयूक्त यावर बैठक लावून निर्णय देत नाहीत तो पर्यंत साखळी उपोषण सूरू करत असल्याचे प्रा. बी. बी. शिंदे यांनी यावेळी सांगीतले

यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कैलास कदम, तुषार कामठे, युवराज दाखले, देवेंद्र तायडे, राजन नायर, मयुर जाधव, सूरेश भिसे व विविध संघटनेचे शेकडो कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला होता.

दरम्यान लोकसेवक युवराज दाखले यांनी केलेल्या सहकार्यामुळे सकारात्मक न्याय मिळणार असल्याने अमरण उपोषणकर्ते प्रा. बी. बी. शिंदे व इतरांनी समाधान व्यक्त करून युवराज दाखले व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!