देश-विदेशसामाजिक

वेळ आलेली, नवऱ्यासोबत गच्चीवर बोलता, बोलता कधी आयुष्य संपलं तिलाच नाही कळलं..

(कोपरगाव प्रतिनीधी- अजय विघे) मनाला चटका लावणारी घटना, जे घडलं ते खूपच धक्कादायक. अबीरामी आणि प्रवीण फेरफटका मारण्यासाठी म्हणून गच्चीवर गेले होते. गच्चीच्या कठड्यावर बसून दोघांना गप्पा मारताना नातेवाईकांनी पाहिलं होतं.
चेन्नई : आयुष्याच काही खरं नसतं. वेळ आली असेल, तर कधी काय घडेल ते सांगता येत नाही. ध्यानी, मनी नसताना एखादी व्यक्ती अचानक जगाचा निरोप घेते. आजारपण, अपघातच नाही, तर एखाद्या चांगल्या प्रसंगातही मनाला चटका लावणारी घटना घडते. आपल्या हाती फक्त, हे असं कसं झालं? एवढच म्हणण उरतं. अशीच एक धक्कादायक घटना सोमवारी रात्री चेन्नईच्या तिरुमुल्लैवोयल मध्ये घडली.
एका 25 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. ती घराच्या गच्चीवर बसली होती. त्यावेळी काळाने तिला गाठलं.
“घातपाताची शक्यता ?”
अबीरामी असं मृत महिलेच नाव आहे. ती घरच्या गच्चीच्या कठड्यावर बसून नवऱ्यासोबत गप्पा मारत होती. त्यावेळी अबीरामीचा मृत्यू झाला. अबीरामीचा तोल जाऊन ती खाली पडली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे.
“हातात होता मोबाइल फोन”
ही दुर्देवी घटना घडली, तेव्हा अबीरामीपासून तिचा नवरा लांब बसला होता. त्यामुळे तिला वाचवता येणं शक्य नव्हतं. अबीरामी खाली पडली, त्यावेळी तिच्या हातात मोबाइल फोन होता. दुसऱ्या मजल्यावर टेरेस आहे. त्याची भिंत मोठी नव्हती. त्यामुळे तिला बॅलन्स करता आला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
दोघांना गप्पा मारताना नातेवाईकांनी पाहिलेलं
अबीरामी आणि प्रवीण कुमार यांच्या लग्नाला फक्त अडीच वर्ष झाली होती. अबीरामाच्या भावाचा बर्थ डे होता. त्यामुळे सगळे कुटुंबीय एकत्र जमले होते. रात्रीच्या जेवणानंतर अबीरामी आणि प्रवीण फेरफटका मारण्यासाठी म्हणून गच्चीवर गेले होते. गच्चीच्या कठड्यावर बसून दोघांना गप्पा मारताना नातेवाईकांनी पाहिलं होतं.
एका शेडवर आदळली
अबीरामी गच्चीवरुन खाली पडल्यानंतर प्रवीणने लगेच घरात असलेल्या नातेवाईकांना याची कल्पना दिली. ते सर्व अबीरामीच्या मदतीसाठी धावले. अबीरामी वरुन खाली पडताना एका शेडवर आदळली. त्यानंतर डोक्यावर पडली
“मृत्यूच कारण काय?”
तिला आधी जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. त्यानंतर तिला राजीव गांधी सरकारी रुग्णालयात हलवलं. तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. तिच्या डोक्याला भरपूर मार लागला. बराच रक्तस्त्राव झालेला, असं पोलिसांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!