सामाजिक

आज सकाळी एम.एस.ई.बी. कार्यालय बालाजीनगर भोसरी येथे भिमशाही युवा संघटनेच्या वतीने आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

भोसरी विभागाचे जातीयवादी सहाय्यक कार्यकारी अभियंता हे मार्गासवर्गीय भागातील झोपडपट्टीतील कामे करण्यस टाळाटाळ करत असल्याबाबत निवेदनात लिहिले आहे. सहाय्यक कार्यकारी अभियंता हे जातीयवादी भावनेतूनच झोपडपट्टी भागातील कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याचे अनेक वेळा नागरिकांना अनुभव येत आहे. नेहरूनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी भागातील लाईट गेल्यानंतर दोन दोन दिवस चालू केली जात नाही.
तसेच भोसरी विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता त्यांच्या ऑफिस मधे हजर नसल्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यांच्याविषयी ऑफिसला चौकशी केली असता साहेब साइट वरती गेल्याचे सांगीतले जाते.
असेच उत्तर सतत नागरिकांना दिले जाते.
तसेच नेहरूनगर, विठ्ठल नगर भागातील लाईट महिन्यातून तीन ते चार दिवस बंद राहते ती चालू करण्यास दोन दिवस लागतात वरील सहाय्यक कार्यकारी अभियंता हे मार्गासवर्गीय वस्तीतील कामे करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्यामुळे वस्तीतील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी आदरणीय साहेब वरील सहाय्यक कार्यकारी अभियंता यांची तत्काळ भोसरी विभागातून हकालपट्टी करावी.
अन्यथा पुढील आंदोलन हे आपल्या कार्याला समोर उपोषण करून केले जाईल. असे शिवशंकर उबाळे यांनी सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!