देश-विदेशविशेष

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने देशभरात निदर्शने करण्यात आली.

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सुरत मधील सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने तसे आदेश जारी केले आहेत. राहुल गांधी केरळ मधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.
राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केला होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. व त्यांना लगेच जामीन ही दिला होता.
महाविकास आघाडीने या संदर्भात निषेध व्यक्त केला. भारत भर सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!