खोदून ठेवलेल्या खंदकनाल्यात अडकला मालवाहू टेम्पो
(कोपरगाव-प्रतिनीधी-अजय विघे) शहरात खंदकनाला रस्त्याने पहाटी निलाव भरतो त्या निलावात तालुक्यातील बाहेरील जिल्ह्यातील शेतकरी आपला माल घेऊन येतो तसाच एका शेतकरी बांधवांची गाडी येथून जात असतांना गाडी फसली आहे. हिच गाडी डाव्या ऐवजी उजव्या बाजुने असती तर प्राणघातक अपघात झाला असता जिथे ही गाडी फसली त्याजवळच महावितरणचे रोहित्र आहे. याचं रस्त्यावरून पुढं गेल्यावर अंदाजे चार बाय चारचे काही चेंबर आहेत. तिथेही अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे नगरपालिका कधी लक्ष देणार आहे. गंभीरतेने दक्ष देणार का हा प्रश्न सामन्यांच्या मनात आजही अनुत्तरित आहे.
जनतेला सुविधा मिळो अथवा नाही पण नगरपालिका प्रशासन मार्च महिन्यात रविवारी नगरपालिका उघडी ठेऊन कर वसुली करत आहे. पण नागरीकांना सुविधा मात्र सुमार दर्जाहीन देते.
याच महिन्यात काही दिवसापूर्वी माझी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी खोदून ठेवलेल्या या खंदक नाल्याबाबत जनतेचे व नगरपालिका
प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु काहीही कार्यवाही झालेली नाही.
आज पहाटे कांदे घेऊन जाणारा टेम्पो त्याच ठिकाणी फसला असून थोडक्यात दुर्घटना टळली आहे. *आतातरी सदर काम लवकरात लवकर पूर्ण होईल का?* अजूनही एखादी घटना घडल्याची वाट नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी पाहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.



