भाजप नेते खासदार गिरीष बापट यांचे आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी माध्यमांना दिली. गिरीष बापट यांच्या पश्चात कुटुंबात एक मुलगा आणि पत्नी आहे.
गिरीश बापट आजारी असल्यामुळे त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळे त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. परंतु बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आज सायंकाळी सात वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
आजारी असताना ही पक्षासाठी कसबा विधानसभा पोट निवडनूकीत प्रचाराकरीता ते उतरले होते.
यावेळी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. यावेळी प्रकृती ठीक नसतानाही गिरीश बापट यांनी रासनेंसाठी प्रचार केला होता. त्यावेळी देखील ते उपचार घेत होते.



