श्री. राजन नायर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
मा. श्री. राजन नायर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. तसेच दक्षिण भारतीय आघाडी, ख्रिश्चन आघाडी प्रभारी पदावर, ही निवड झाली. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे हस्ते सरचिटणीस पदाचे पत्र देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे बोलले आपण पक्षाचा व संघटनेचा अधिककाधिक विस्तार करुन दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. श्री. शरदचंद्रनी पवार साहेब यांचे विचार समाजातील तळागाळात पोहचविण्याचे यशस्वी प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त केला.
राजन नायर यांनी असंख्य कार्यकर्त्यांन सोबत मा. अजित पवार यांचे हस्ते पक्ष प्रवेश केला होता, नायर हे एक उच्च शिक्षित केरळी समाजचे नेते आहेत.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नायर यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी नाना काटे, कविता आल्हाट, इमरान शेख, अवसरमल, देवेंद्र तायडे, के.डी. वाघमारे, संतोष निसर्गगंध, गोरख लोखंडे, कविता कराडे, व सर्व आजिमाजी नगरसेवक, सर्व शहार कार्यकारणी सदस्य उपस्थित होते




