शहरसामाजिक

“धारणगाव रोड वरील स्पीड ब्रेकरची उंची वाढवावी” ॲड. नितीन पोळ

प्रतिनिधी अजय विघे|
कोपरगाव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते नागरे पेट्रोल पंप या नगर पालिका हद्दीतील धारणगाव रोड वरील रस्त्याच्या स्पीड ब्रेकर ची उंची वाढवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ वतीने नगर पालिकेला एका निवेदनाद्वारे केली
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की नगर पालिकेच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून जीर्ण झालेल्या धारणगाव रोड ची दुरुस्ती करण्यात आली मात्र रस्ता चांगला झाल्यामुळे या रस्त्यावर वाहन चालक सुसाट गाड्या चालवतात या रस्त्यावर तीन चार ठिकाणी स्पीड ब्रेकर बनवले आहे मात्र त्यांची उंची कमी असल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे सुसाट चालणाऱ्या वाहन चालक अनेकदा स्पीड ब्रेकर वरून पडतात या रस्त्या बाजूला अनेक उपनगरे असल्याने मोठी वर्दळ आहे तसेच पोलीस व महसूल अधिकारी यांच्या आशीर्वाद असल्याने या रस्त्यावरून वाळूचे डंपर सुसाट वेगाने धावत असतात त्या बाबत नवनियुक्त पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन सुसाट डंपर चा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती मात्र अर्थपूर्ण तडजोडी मुळे महसूल व पोलीस अधिकारी या डंपर कडे कानाडोळा करत आहेत.या सुसाट डंपर मुळे मोठा अनर्थ घडल्यावर पोलीस व महसूल जागे होईल मात्र तत्पूर्वी नगर पालिकेने या रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकर ची उंची वाढवावी अशी मागणी या निवेदनाद्वारे अँड.नितीन पोळ यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!