महामानवांच्या जयंती निमित्त सरकारने नशाबंदी सप्ताह जाहिर करावा. बी. बी. शिंदे
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महामानव महात्मा जोतीराव फुले, व बोधिसत्व, संविधान निर्माते प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त, नशाबंदी सप्ताह जाहीर करण्यात यावा.
अशी मागणी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या सामाजिक संघटने कडून, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रधान सचिव, सामाजिक न्याय व समाज कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई 32 यांचे कडे दिनांक 28 मार्च 2023 रोजी लेखी निवेदना द्वारे करण्यात आली.
यात या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ,प्रा. बी. बी. शिंदे, यांनी सांगितले की, वरील विषयांकित मागणी आम्ही गेल्या वर्षी म्हणजेच 2022 ला केली होती, त्या मागणीस प्रतिसाद देऊन शासनाने केवळ एक दिवसाचा 14 एप्रिलला “Dray day” घोषित केला, त्या बाबत आम्ही आमच्या संघटने तर्फे शासनाचे आभार मानतो.
त्याच धर्तीवर या वर्षी 11 एप्रिलला क्रांती सूर्य महामानव महात्मा जोतीराव फुले यांची जयंती असते तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला असते ,म्हणून या चालू वर्षा पासून ,केवळ एक दिवसाचा Dray day घोषित करण्यापेक्षा पूर्ण एक सप्ताह Dray day घोषित करण्यात यावा .
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, आम्हाला माहिती आहे, हे केल्यास शासनाचा महसूल बुडतो, परंतु या महामानवांला अभिवादन करण्यासाठी, सर्व समाज सुस्थितीत असावा या साठी शासनाने या दोन्ही जयंती निमित्त एक सप्ताह Dray day जाहीर करून ,सहकार्य करावे, अशी विनंती केली.
या निवेदनावर यासंघटनेचे सचिव हरीचंद्र शिंदे, सह सचिव लक्ष्मण सिरसाट, संघटक शिवराज वाघमारे, सह संघटक रामभाऊ ओव्हाळ, तसेच रिपब्लिकन सेनेचे नेते मा. मुकुंद रणदिवे, मा. राजू गायकवाड ,सर्व हारा या सामाजिक संघटनेचे सदस्य तुकाराम गव्हाणे, दिलीप बनसोडे यांच्या सह्या सह मागणी केली आहे.
तसेच या साठी सर्व फुले आंबेडकरी चळवळीतील पक्ष व संघटना यांनीही या संदर्भात शासनाकडे मागणी करावी, असे आवाहन ही या वेळी करण्यात आले.



