प्रतिनिधी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत नागरवस्ती विभागाकडून महिलांसाठी व दुर्बल घटकातील तसेच विद्यार्थ्यां साठी अनेक योजना राबवल्या जातात. त्या मध्ये विधवा महिलांच्या अर्थ सहाय्यासाठी विधवा महिलांना १०,०००/- हजार रुपये तसेच कोव्हीड मध्ये विधवा झालेल्या महिलांना २५,०००/-हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून पालिके मार्फत देण्यात येतात.
त्यामध्ये महापालिकेच्या योजनेच्या अटी शर्ती मध्ये काही बदल करण्यात आला होता. तो म्हणजे वयाची अट.
कुंटूंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर आलेल्या संकटात
कुंटूंबाच्या सदस्यांबरोबर कुंटूंब कसे चालवावे हा प्रश्न त्या विधवा महिलांना पडलेला असतो. आलेले संकट हे सांगून आलेले नसते ज्या वेळेस घरातील कर्ता पुरुष मरण पावतो त्या वेळेस दवाखान्याचे बिल तसेच मूलांची शाळेची फीस, कर्जाचे बॅंकेचे हप्ते अशा सर्व आर्थिक संकटांना त्या विधवा महिलांना सामोरे जावे लागते. त्यासाठी महापालिकेने वयाच्या अटी-शर्ती लावू नये. महापालिकेमार्फत विधवा महिलेला देण्यात येणारे
अर्थसहाय्य फक्त १०,०००/- हजार रुपये इतके आहे. त्यामध्ये शहरातील ५० ते ६० टक्केच महिला अर्था सहाय्याचा लाभ घेत असतात. विधवा झालेली महिला ही कोणत्याही वयात विधवा होऊ शकते, यासाठी महापालिकेने कोणतीही वयाची अट ठेवू नये. महिला जेवढी जास्त वयात होते तेवढया जास्त वयात तिला
विधवा अर्थसहाय्याची गरज असते.
मा. आयुक्त साहेब, आपण या निवेदनाचा विचार करुन लवकरात लवकर विधवा महिलांना जे अर्थसहाय्य दिले जाते त्यात वयाची अट रद्द करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेकडून महाराष्ट्रामध्ये श्रीमंत
असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निषेध करण्यात येईलक. अशा स्वरूपाचे पत्र दिनांक ०३/०२/२०२३ रोजी सिमा बेलापूरकर पिं. चिं. शहर सचिवयांनी आयूक्तांना दिले होते या पत्राने प्रशासन जागे झाले व आपली चूक लक्षात आल्याने त्यांनी दि.२१/०३/२०२३ महापालिकेच्या ठरावात हे मंजूर केले की वयाची अट रद्द करावी तशी ती रद्द ही करण्यात आली हे विधवा महिलांन करीता खूप आनंदाचे होते असे सिमा बेलापूरकर यांनी सांगीतले यावेळी अश्वीनी बांगर, संगीता देशमुख, संगीता विश्वकर्मा, ज्योती सोनवणे, निलम सोलापूरकर, दक्षता क्षिरसागर, विशाखा बनसोडे, स्वाती पांचाळ, योगीता विभुते, श्रद्धा देशमुख, आदिती चावरीया या उपस्थित होत्या.




