महाराष्ट्रसामाजिक

पाप मूक्त करून देणारी पार्टी, भारतीय जनता पार्टी – प्रा. बी. बी. शिंदे.

तुम्ही कितीही पाप करा, कितीही भ्रष्टाचार करा, कितीही देशाला लुबाडा, तुम्ही कितीही देशातील बँकांला बुडवा, कर्ज परतफेड करू नका. देश सोडून पळून जा. तुमच्या मागे कितीही मोठी ईडी, सीबीआय, इत्यादी सारख्या शासकिय यंत्रणा लागू ध्या. तुम्ही कितीही मोठा देश द्रोह्यां सारखा घोटाळा करा ,तुम्ही समाज द्रोही असा,
तुम्ही जर इतर कोणत्याही पक्षातून, भाजपात प्रवेश केलात तर तुम्हाला ते सर्व गुन्हेमाफ होऊन, तुम्ही धुतल्या तांदळा सारखे स्वच्छ होताल, हे मागील इतिहासाच्या घडलेल्या अनेक उदाहरणे पहाता दिसून येते.
लहान पनी आजी गोस्ट सांगायची, गायीची चहाडी करु नये .मग तिने अख्या उभ्या पिकाची नासाडी केली तरी चालेल, ( या मागचे कारण असे होते की, त्या गायीचे दूध उच्चवर्णीय ब्राह्मणाला लागत असे .) कारण टाकाऊ मालाचा धनी आमचा बळीराजा शेतकरी वर्ग असे.
परंतु आतां आमचा बहुजन समाजातील बळीराजा शेतकरी वर्ग शिकून सावरून शहाणा झालेला आहे. तुमच्या या सर्व खेळी तो चांगला ओळखुन आहे.
म्हणून आत्ता आम्ही तुम्हाला खबरदार करतोय, या पुढे तुमचे नखरे, चाळे आम्ही कदापी चालू देणार नाहीत, म्हणून म्हणावेसे वाटते की, लबाड लांडग , “ढोंग करत अच्छे दिनच साॅंग करतय” स्वप्न दाखवतया एक बोलतंय दूसरच, करतय तिसरच !!
त्यांची दुसरी घोषणा सबका साथ , सबका विकास. सबका नव्हे ,फक्त दूर्गूणांचा साथ, स्वताचाच विकास.
सध्या गरिबांचे मरण, भाजपच राखीव कुरण, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. देशातील लोकशाही, संविधान वाचवायचे असेल तर सर्व बहुजन समाजाने एकत्र आल्या शिवाय गत्यंतरच नाही. मग झेंडा कोणता ही असो नेता कोणता ही असो ..
“घराणे म्हणालतर आंबेडकर, पवार, ठाकरे किंवा गांधी देश या (भाजपा) स्वयम घोषित इंग्रजान पासून वाचवण्याची हीच खरी संधी” त्यासाठी सर्व बहुजन समाजात जाणीव जागृतीची गरज आहे. एकच ध्येय देश वाचला पाहिजे, संविधान वाचले पाहिजे, देशातल्या लोकांनमधली मानूसकी वाचली पाहीजे…
असे बी.बी.शिंदे बोलताना म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!