राहुल गांधी यांचे खासदार पद रद्द झाले या विरोधात निषेध व्यक्त करण्यास काॅंग्रेसच्या वतीने नागरिकांची स्वाक्षरी मोहीम..

मा. राहुलजी गांधी , खासदार
यांचे खासदार पद, सूड भावनेने, द्वेष भावनेने, राजकीय हेतूने रद्द करून, सर्व सामान्यांचा आवाज दाबण्यासाठी, बीजेपीने व आर. एस. एस. प्रेरित कारवाईच्या निषेधार्थ नागरिकांची स्वाक्षरी मोहीम ,राबवण्याचे कार्य पिंपरी चिंचवड शहर ( जिल्हा ) काँग्रेस कमिटीचे, शहर अध्यक्ष मा. डॉ. कैलास (भाऊ) कदम यांचे नेत्रूत्वा खाली, नाशिक फाटा चौक, कासारवाडी, पुणे येथे मा. अभिमन्यू दहितुले (आण्णा) व त्यांचे सहकारी दिनांक 28 मार्च 2023 ते 13 एप्रिल 2023 पर्यंत स्वाक्षरी मोहीम राबवित आहेत.
आत्ता पर्यंत या परिसरातील म्हणजेच दिनांक 08 एप्रिल 2023 पर्यंत एकूण 11000 नागरिकांनी स्वाक्षरी करून, राहुल गांधींना पाठिंबा देऊन आपली नोंद करून,
भारतीय जनता पार्टीचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे .
यासाठी या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते व नेते मा .श्री. कैलास भाऊ कदम पिंपरी चिंचवड काँगेसच्या महिला शहर अध्यक्षा सौ. सायलिताई नढे, श्री. अभिमन्यू दहितुले आण्णा, श्री. भाऊसाहेब मुगुटमल, श्री. पांडुरंग शेठ जगताप, श्री. हरिषजी डोळस, श्री, अस्तिराम लहू, श्री. अर्जुन लांडगे, श्री. तुकाराम गव्हाणे, श्री. मिलिंद फडतरे, श्री. किरण खोजेकर, श्री. उमेश बनसोडे, श्री. अण्णासाहेब कसबे, श्री. गौतम आराखडे, श्री. किरण नढे, श्री. पै. विठ्ठल शिंदे, श्री. मा. प्रा. बी. बी. शिंदे इत्यादी अनेक कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राणपणाने झटत आहेत.
श्री. विश्वनाथ जगताप, श्री. माऊली मलशेट्टी, श्री, मा. विजय ओव्हाळ अध्यक्ष मागासवर्गीय सेल, पिंपरी चिंचवड शहर. हे ही वेळोवेळी उपस्थित राहून कामकाजात मदत करताना दिसत होते.





