३१ डिसेंबरच्या रात्री वाहन चालकांच्या तपासणीसाठी शहरात ३० नाकाबंदी ठिकाणे..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ डिसेंबर २०२३ नववर्षाच्या स्वागतार्थ बरेच नागरिक घराबाहेर पडून मध्यरात्रीपर्यंत पार्ट्यांचे आयोजन करत असतात. बऱ्याचदा नागरिक नशा करून वाहन चालवून स्वतःचे तसेच इतरांचे जीवास धोका निर्माण करत असतात. या सर्व बाबींना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आज दि. ३१ डिसेंबरच्या रात्री पिंपरी चिंचवड पोलीसांचे वतीने ३० ठिकाणी कडेकोट नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे.
नाकाबंदीच्या ठिकाणी प्रत्येक वाहनचालकाची कसुन चौकशी करण्यात येणार असुन ब्रेथ ॲनालायझर मशीनच्या साहाय्याने श्वासाचे नमुने तपासण्यात येणार आहेत. दारु पिवून वाहन चालवणाऱ्या प्रत्येक वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांचे वाहन अटकावून ठेवण्यात येणार आहे.
कोणीही नशा करुन अथवा धोकादायकरीत्या वाहन चालवू नये. तसेच नववर्षाचे स्वागत उत्साहाने परंतु शांतपणाने, कायद्याचे पालन करुनच करावे व शांतता राखण्याच्या दृष्टीने आपले योगदान द्यावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीसांचे वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीसांचे वतीने व अनुवाद आपला न्यूजच्या वतिने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा…!



