
प्रतिनिधी- पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष, “कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले” यांच्या पाठपुराव्यामुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने “सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम” अंतर्गत उद्या दि.13 एप्रिल 2023 रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 6 वाजता नेहरूनगर शेजारील जुन्या विठ्ठलनगर मधील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह येथे महात्मा ज्योतीराव फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन केले असून सर्व कार्यकर्ते, महिला मंडळे, नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानरुपी विचारांचा लाभ घ्यावा. असे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राहूल भोसले कार्यक्रमा संदभ्रात बोलत होते.



