
प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड क्रांतीसूर्य महात्मा फूले व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आबेंडकर जयंतीचा कार्यक्रम पिंपरी येथे चालू आहे. परंतु मंगळवार सायंकाळी पाच वाजता ‘महामानवांना अभिप्रेत समतावादी समाज व्यवस्था व चित्रपट माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता. मात्र यासाठी बोलवण्यात आलेले प्रमुख पाहुणेच कार्यक्रमाला उपस्थित नव्हते यासंदर्भात प्रशासनाला विचारले असता प्रशासनाने स्पष्ट केले की दिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, यांच्या तारखा मिळालेल्या नव्हत्या पण आम्हाला विश्वास होता की आम्ही त्याना संपर्क करून ११तारखेच्या सायं.०५च्या कार्यक्रमाला उपस्थित करू. “सारे हवेतले बंगले बांधनारे प्रशासन” कार्यक्रमा संदर्भात हवे तितके उस्ताही दिसत नाही प्रशासन बस “उंटावरून शेळी हाकतेय असेच दिसतेय” हे तिन ही कलाकार येणार नव्हते तर त्या ऐवजी दूसरे कलाकार का नाही आणले ?
महानगर पालिकेत इतके अनूभवी अधिकारी असताना आपल्या गटातील कार्यकर्ते व्यवस्थापणात घेतले गेले जे कार्यकर्ते सर्रास नाॅट रिचेबलच दिसतात मग अशी व्येवस्था करून या “विचार प्रबोधन पर्वाच्या” सप्ताहाचा खेळखंडोबा करायचे ठरवले आहे का ? अशा कार्यकर्त्यांची प्रशासनाला तक्रार केली असता जाब विचारण्या ऐवजी प्रशासन त्यांची बाजू घेवून त्यांना वाचवतानाच वेळोवेळी दिसते.
प्रॉब्लेम ऑफ रूपी या “डॉ, बाबासाहेब आंबेडकर” लिखित ग्रंथाला १०० वर्ष झाल्याबदल अर्थतज्ञ डॉ. नरेद्र जाधव व भालचंद्र मुगणेकर यांना आमत्रीत करायचे ठरले अर्थ तज्ञाशी बोलणे ही झाले. पण ह्या विषयी संबध नसणार्यांना आमंत्रीत करण्यात आले. त्यांतील अनेक वक्ते गैरहजर होते. एक ना अनेकदा हा प्रकार होताना दिसतो आहे “पुन्हा ढिसाळ कारभार” कार्यकर्यात्यांन मूळे होत आहे का असा प्रश्न पडतो आहे.
याबाबत आंबेडकर जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.



