
प्रतिनिधि पुणे :- पुणे जिल्हा B S 4 चेतना रॅली, 11 एप्रिल2023 महामानव क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त, भिडेवाडा ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले वाडा. पुणे जिल्हा बामसेफ युनिट व सामाजिक संघटनांच्या वतीने B S 4 महा जनजागरण अभियान अंतर्गत संविधान जन जागृती रॅली तथा मूलनिवासी बहुजन एकजूट चेतना रॅली काढण्यात आली.
रॅलीची सुरवात राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी 01 जानेवारी 1848 रोजी सुरू केलेल्या, भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेपासून ( भिडे वाडा ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या फुले वाडा ( गंज पेठ ) पर्यंत चेतना रॅली काढण्यात आली. या रॅलीत बामसेफ, मूलनिवासी संघा बरोबर इतर दोन मूलनिवासी बहुजन समाजाच्या संघटनांनी ( सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना व बी .आर .एस. पी. )यांनी सहभाग नोंदवला .
रॅलीचे संचालन भिडे वाडा ते राष्ट्रपिता महात्मा फुले वाडा असे दोन की. मी. अंतर होते. या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांच्या हातात भारतीय संविधान सन्मान सुरक्षा, संवर्धनाचे जवळपास 55 /60 बॅनर होते. ही संविधान रॅली फुले वाड्यावर पोहनचल्यावर राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले, व माता सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
पुणे जिल्हा अध्यक्ष मु. शहाजी गोरख सर यांनी प्रास्ताविक केले.
B S 4 महा जनजागरण अभियानाच्या संबंधाने कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले, मा. मु. सूर्यवंशी विठ्ठल के, मा. मूलनिवासी सुरेश कांबळे ( बामसेफ महाराष्ट्र राज्य कार्यकारीनी सदस्य तथा पुणे जिल्हा प्रभारी ) मा. मूलनिवासी व्ही. जे. वाघमारे ( वरिष्ठ कार्यकर्ते व नेते), प्रा .बी. बी. शिंदे हे यावेळी बोलताना म्हणाले की, ज्या महामानव राष्ट्रपिता जोतीराव फुले व माता सावित्री माई फुले यांनी बहुजनांची खऱ्या अर्थाने अधोगती कश्या मुळे झाली, याचे मूळ कारण शोधून, 01जानेवारी 1848 साली ज्या भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणा साठी भारतातील पहिली शाळा काढून, स्त्री व दलित बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज सर्व जातीय, सर्व धर्मीय स्त्री ही स्वाभिमानी बनून प्रगत झाली ,त्या भिडे वाड्याची आज अशी दुर्दशा का व्हावी, हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे.
या देश्यात भारतीय संविधानाचा अमल चालू झाल्या पासून, केंद्रात व राज्यात अनेक वेगवेगळ्या विचार धारेची सरकारे आली व गेली, तरी या भिडे वाड्याचे राष्टीय स्मारक का होऊ शकले नाही, यांचे कारण काय असावेहा मुख्य प्रश्न उपस्थित होतो. आज पर्यंत कुठल्या पक्ष्यांची विचार धारा कशीही असो, परंतु या पुढे भिडे वाडा हे राष्ट्रीय पातळीवर स्मारक कसे होईल ,यासाठी आमची सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, ही सामाजिक संघटना या साठी पुढाकार घेऊन सरकार, दरबारी प्रयत्न करेल, त्या साठी सर्वांनी सहकार्य द्यावे, असे आव्हान बहुजन समाजातील सर्व पक्ष, संघटनांना केले आहे .
कार्यक्रमाची सांगता कर्मचारी कल्याण महासंघ महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. मूलनिवासी ऍड. मोहनराव सोनवणे यांनी केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत संघाचे जिल्हा अध्यक्ष मा. मु. रमेश सरोदे, मा. मु. ऍड .दिगंबर मोरे, M N T news net work चे मा. मु. नीलकंठ लांडगे, सर्व हारा समाजाचे, मा. तुकाराम गव्हाणे, मा. विठ्ठल लांडगे, मा. दिलीप बनसोडे, मा .सौ. सुरेखा वाघमारे, मा. सीमा ताई गजभिये, मा. कलाबाई गुंजाळ, मा. मु. समाधान अहिरे पुणे जिल्हा कोषाध्यक्ष, मा. मु. भारत मोरे, मा. मु. आर. डी. पाटील, मा. मु. अरुण कांबळे, मा. मु. निखिल मोरे, मा. मु. शुभम सूर्यवंशी, मा. मु. राज कांबळे, तसेच मा. मु .संघाच्या नेत्या सुनीता गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
मा. मूलनिवासी व बामसेफ जिल्हा युनिटचे महा सचिव मा .उमेश भारती यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून, सर्व भारतीय बहुजनांना राष्ट्रपिता महात्मा फुले जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या…




