
प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागा अंतर्गत “क” क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या नेहरूनगर या ठिकाणावरील तीन व भोसरी विभागातील चक्रपाणी क्षेत्रातील पुणे नाशिक हायवे लगतच्या सहा अशा एकूण नऊ वॉशिंग सेंटर साठी घेतलेल्या अनधिकृत नळ कनेक्शन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत बंद करण्यात आले आहेत. सदरच्या कार्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या “क” प्रभाग पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, चार कनिष्ठ अभियंता, चार प्लंबर, दोन मीटर निरीक्षक व एम एस एफ चे एकूण १५ जवान यासह सदरची कारवाई करण्यात आली.




