कोंढाणे बुद्ध लेणी धम्म सहल मोठ्या उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०१ जूलै २०२५ बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती (महाराष्ट्र) व एकजूट लेणी प्रचार प्रसार समूह (महाराष्ट्र) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या धम्म सहलीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
लेणीच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर एकजूट लेणी प्रचार प्रसार समूहाने आणलेल्या झाडांचे/वृक्षांचे धम्म सहलीत आलेल्या सदस्यांना वाटप करण्यात आले व लेणी कडे जात असताना मधल्या मोकळ्या जागेत या वृक्षांची लागवड करण्यात आली.
लेणी कडे जात असताना जे पूर्वी लावण्यात आलेले दिशादर्शक फलक दुरुस्त करण्यात आले व काही नवीन दिशादर्शक फलक लावण्यात आले. लेणीमध्येही चप्पल शूज घालून न जाण्याचा सूचनेचा फलक लावण्यात आला.
लेणीमध्ये पोहोचल्यानंतर प्रथम आदरणीय भंन्ते राहुल यांच्या समवेत चैत्यगृहातील स्तूपास प्रदक्षिणा घालण्यात आली व त्यानंतर भंन्ते यांना त्रिशरण पंचशील देण्याची याचना करण्यात आली व त्रिशरण पंचशील ग्रहण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन मनोज गजभार लेणी प्रेमी इतिहास प्रेमी यांनी केले. तर कोंढाणे बुद्ध लेणीची माहिती राजू भालेराव पालीभाषा अभ्यासक व विविध लिप्यांचे अभ्यासक लेणीप्रेमी यांनी सर्व उपस्थितांना व्यवस्थितरित्या समजावून सांगितली त्यानंतर सुरत सोनकांबळे प्राचीन लिप्यांचे अभ्यासक व लेणीप्रेमी यांनी या लेणीतील शिलालेख व त्याचा अर्थ सर्व उपस्थितांना समजेल अशा सोप्या भाषेत व्यवस्थितरित्या समजावून सांगितला.
पूज्य भंन्ते राहुल यांनी हा आपला प्राचीन वारसा कशाप्रकारे संवर्धित करण्यात येईल याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले.
एकजूट लेणी प्रचार प्रचार समूह महाराष्ट्र यांचे संस्थापक अध्यक्ष सारीश डोळस यांनी सर्व उपस्थिततांचे आभार मानले व यापुढेही अशा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे लेण्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास पुणे मुंबई सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील उपासक उपासिका उपस्थित होत्या
मुंबई पुणे या ठिकाणाहून ३ बस आल्या होत्या व छोट्या फोर व्हीलर टू व्हीलर इत्यादी वाहनांमधून २५० ते ३०० पेक्षाही जास्त सदस्य उपस्थित होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज गजभार, सारीश डोळस, रवी कांबळे, राम भंडारे सुरज सोनकांबळे, राजू भालेराव, सुरेश वाघमारे, राहुल बनसोडे, प्रफुल पुरलकर यांनी विशेष प्रयत्न केले.



