अखेर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांच्या स्मारकाचा मार्ग झाला मोकळा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ फेब्रुवारी २०२५ पिंपरी चिंचवड शहराच्या विकास योजनेत स.नं. १५५ अ पै. (सि.स.नं. ५६६५ पै.) मध्ये आ.क्र. ९८ क्षेत्र एक हेक्टर या जागेवर PCMT Bus Terminus हे आरक्षण प्रस्तावित आहे. सदरच्या आरक्षण विकसनासाठी समुचित प्राधिकरण म्हणून PCMC/PCMT आहे. या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व उद्यान विकसीत करण्यात आलेले आहे, यापुर्वीही विविध संघटनानी महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील पडीक जागा जिचा कोणत्याही गोष्टीसाठी अथवा पीएमपीएमएल साठी वापर करता येऊ शकत नाही. असे क्षेत्र महाराष्ट्र
प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे ३७ कलम अन्वये फेरबदल करून भिमसृष्टी या आरक्षणात समाविष्ट करण्याबाबत मागणी केली होती.
त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांचेकडे सदर ठिकाणी उपरोक्त फेरबदल करणेस ना-हरकत पत्र देणेबाबत अनेकदा विचारणा केली होती. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने दि. ०५ फेब्रुवारी २०२५ रोजीचे पत्रान्वये ना हरकत सादर केली आहे.
प्राप्त ना-हरकतीचे अनुषंगाने काल दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी मा.महापालिका सभा प्रशासकीय ठराव क्र.८५२, दि. २१/०२/२०२५ महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे ३७ कलम अन्वये फेरबदल करणेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांनी मान्यता दिलेली आहे.
कायद्यातील तरतूदींचे अनुषंगाने सदर फेरबदला बाबत नागरीकांकडून एक महीन्याच्या कालावधीत हरकत / सुचना मागविणेबाबत शासन राजपत्रात व मराठी /इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्धीकरण करणेत येईल. विहीत मुदतीत हरकत /सुचना प्राप्त झाल्यास संबंधितांना प्रत्यक्ष सुनावणी देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन तसा अहवाल पुनःश्च मा. महापालिका सभेस सादर करून मा. महापालिका सभेच्या मान्यतेने शासनास अंतिम मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करणेत येईल. त्यानंतर शासन गुणवत्तेनुसार निर्णय घेऊन मंजूरी देणेत येईल व तशी उक्त अधिनियमातील कलम ३७ (२) ची अधिसूचना निर्गमित करणेत येणार आहे. सदर पत्र प्रसिध्दिसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यानी दिले आहे.




