महाराष्ट्रशहरसामाजिक

राजगुरुनगर येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी-मनोज कसबे.

खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील दुर्घटनेत मुत्यू पावलेले कामगार विजय वाडेकर व सुनील पांचाळ यांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोजभाऊ
कसबे यांनी राज्याचे कामगार
मंत्री सुरेश खाडे यांना त्यांच्या
निवासस्थानी जाऊन समक्ष
भेटून एका निवेदनाव्दारे केली आहे.

यावेळी शिव-श्रमिक मजदुर संघटनेचे उपाध्यक्ष सतिश भांडेकर, सचिव गोपाल कच्छवे, कार्याध्यक्ष अमितमोहिते, महामानव एक्सप्रेस कामगार संघटनेचे अध्यक्ष गिरीश साबळे, पदाधिकारी मलखान ठाकुर, इम्तियाज सिद्दीकी तसेच ह्युमन राईट्स चे विनोद क्षीरसागर व इतरही कार्यकर्ते तिथं उपस्थित होते.

राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या ह्या अपघाताची माहिती मिळताच मनोज भाऊ कसबे आणि शिव श्रमिक मजदुर संघटनेचे पदाधिकारी यांनी त्वरित घटनास्थळावर जाऊन त्याची पाहणी केली व मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच सदरच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या केवळ ठेकेदार यांच्यावरच गुन्हा दाखल करुन घराचे मालक यांच्यावर मात्र कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. कामगार आघाडीचे मनोज कसबे शिव श्रमिक मजदुर संघटनेचे पदाधिकारी यांनी राजगुरुनगर पोलिस ठाण्यात जाऊन सर्वच दोषी व्यक्तिवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवदेन राजगुरुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांना दिले. व त्या अनुशंगाने घरमालकावर देखील कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार क्षेत्रातील अनेक कामे करत भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीने अशा कित्येक प्रकरणांचा व्यवस्थित पाठपुरावा केला आहे. तसेच ह्या प्रकरणाचा देखिल पाठपुरावा करून शासनाकडून आर्थिक मदत कामगारांच्या कुटुंबियांना मिळवुन देण्याचा मनोदय मनोजभाऊ कसबे यांनी व्यक्त केला आहे.
सदरच्या दुर्दैवी अपघातात मृत्युमखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त व्हावी. पुणे जिल्ह्यातील नाका कामगार यांच्यासाठी अटल आहार योजना सुरु करण्यात यावी तसेच नोंदीत बांधकाम कामगार यांना अवजारे खरेदी करण्यासाठी दिले जाणारे रुपये 5000अनुदान पुन्हा सुरु करण्यात यावे अशा सर्व मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री सुरेश खाडे यांना देण्यात आले आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!