भ्रष्टाचारा विरोधात रयत शिक्षण संस्थेसमोर आमरण उपोषण – रविराज काळे
प्रतिनिधी-रयत स्वाभिमानी संघटना सातारा यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हंटले आहे की . प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शाॅर्ट कोर्स मध्ये २ कोटी ४० लाख रूपयांचा भ्रष्टाचार केल्या बाबत म्हंटले आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा आणि संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संस्थेने मॅडम यांची तडकाफडकी बदली शिरवळ येथे केली होती.त्यानंतर त्यांची एका चौकशी समिती मार्फत चौकशी केली होती .त्यात डाॅ. बोबडे मॅडम दोषी आढळून आल्या होत्या. त्याच वेळी त्यांचे निलंबन होणे अपेक्षित होते .परंतु काही लोकांनी दबाव टाकून निलंबन थांबविले होते. तसेच केलेल्या भ्रष्टाचाराची भरपाई म्हणून रयत शिक्षण संस्थेने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ४ वर्षे शाॅर्ट टर्म कोर्स मोफत चालविण्याचे जाहिर केले होते. परंतु यामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चार वर्षे मागे गेले आहे. महाविद्यालयाचा विकास थांबवून विद्यालयाला शाॅर्ट टर्म कोर्स चालवणे भाग पडले आहे. यामध्ये महाविद्यालयाचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आज घडीला रयत शिक्षण संस्थेने भ्रष्टाचारी प्राचार्य मंजुश्री बोबडे यांना तीन वर्षे वाढवून देण्याचा घाट घातला आहे तो योग्य नाही. आणि हा घाट कर्मवीर अण्णांच्या विचारांना काळीमा फासणारा आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी यांनी विनंती केली आहे की भ्रष्टाचारी प्राचार्य यांना ३ वर्षे वाढवून देऊन भ्रष्टाचार करण्यास पाठबळ दिले असल्याचे दिसून येत आहे. तसा समाजात चुकीचा संदेश जात आहे. जर आपण कर्मवीर अण्णांच्या विचारांचे पाईक असाल तर आपण बोबडे मॅडम यांना ३ वर्षे वाढवून देण्याचा निर्णय मागे घेतला असता. यासाठीच रयत स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी कर्मवीर आण्णांच्या विचारांची आठवण करून देण्यासाठी येत्या ९ मे २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता रयत शिक्षण संस्थेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
या आंदोलना दरम्यान होणाऱ्या परिणामास रयत शिक्षण संस्थेतील अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे असे रयत स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. असे. रयत स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रविराज बबन काळे यांनी सांगीतले.