महाराष्ट्रसामाजिक

लोहार येथील कानेगाव भीम जयंतीस अनेक पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण..

प्रतिनिधी-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लोहारा येथील कानेगाव मधील जयंती महोत्सव मध्ये विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे लोहारा तालुका अध्यक्ष मा. दिगंबर कांबळे तसेच काकासाहेब भंडारे जिल्हा उपाध्यक्ष उस्मानाबाद, गजेंद्र डावरे युवा तालुका अध्यक्ष लोहारा यांनी निमंत्रित केले.
यामध्ये प्रमुख पिंपरी चिंचवड शहर येथील भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे, नितीन कसबे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शांताराम खुडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष विजय भोसले, काक्रंबा वाडी तुळजापूर युवा नेते महेश कोळेकर, तसेच इतर ही खूप सार्‍या संस्था, पक्ष, पार्टी, व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि सामाजीक कार्यकर्ते कानेगाव येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवांमध्ये सामील होणार आहेत. असे दिगंबर कांबळे यांनी सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!