
प्रतिनिधी दि.२४/०४/२०२३ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहन चोरांवर कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी आदेशित केल्याने गुन्हे शाखा युनिट ०२ कडुन वाहन चोरांचा शोध सुरु होता. चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोरया कॉलनी याठीकाणी फिर्यादी नामे हरीभान बद्रिप्रसाद साहु वय २७ वर्षे, धंदा व्यवसाय रा. मोरश्र्वर कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड पिंपरी, पुणे याने रात्री त्यांच्या मालकीची शाईन मोटार सायकल घरा समोर पार्क करुन ठेवली होती. सकाळी उठून पाहिले असता त्याची मोटार सायकल मिळुन आली नाही.
मो.सा. MH 14 HZ 7217 ही चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी गाडी चोरीची तक्रार चिंचवड पोलीस स्टेशन येथे दि.१६/०४/२०२३ रोजी दिली होती. गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस सदर शाईन गाडी चोराचा शोध घेत असताना पो. हवा. जयवंत राऊत व प्रमोद वेताळ यांना शाईन गाडी ही दिनेश इंगळे याने चोरल्याचे रोडचे सी.सी.टी.व्हि. कॅमेरे पाहुन समजले त्यांनी शाईन गाडी चोराचा माग काढताना आज दि. २४/०४/२०२३ रोजी इसम नामे दिनेश मलकारी इंगळे वय २८ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. सी / ओ ओम गुप्ता यांची रुम दुसरा मजला औदुंबर कॉलनी, नक्षत्रम हॉटेल जवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड यास त्याचे राहते घराचे पाकींग मधुन पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पो.हवा. प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जयवंत राऊत, पो.ना. देवा राऊत, सागर अवसरे यांच्या पथकाने सापळा रचुन त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने तो राहत असलेल्या घराच्या पार्कीगमध्ये चोरलेली शाईन मो.सा. नंबर MH 14 HZ 7217 व दि. ०४/०४/२०२३ रोजी मध्यरात्री लिंकरोड चिंचवड येथिल रेल्वे ट्रॅक जवळील श्री सुमन श्री अर्पामेंन्ट येथिल पाकींग मधुन हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल तिचा नंबर MH 41K6204 हि सुध्दा चोरल्याची कबुली देवून दोन्ही गाडया पार्कींगमध्ये पार्क केल्याची ठीकाण दाखविली. सदर आरोपी कडुन ६०,०००/- रुपये कींमतिच्या ०२ मोटार सायकल जप्त करुन ०२ गुन्हे उघड करण्यात आले.
तसेच एका विधी संघषित बालकास स.पो.फौ. शिवानंद स्वामी, केराप्पा माने पो.ना. १९२३ आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस अंमलदार शिवाजी मुंढे, अजित सानप, उध्दव खेडकर यांनी त्यास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून त्याचे कडे अधिक चौकशी केली असता त्याने चार दिवसापुर्वी मल्हार गार्डन जवळुन नवी सांगवी येथुन एक बजाज ऑटो कंपनीची रीक्षा तिचा नंबर MH 12 TU 3041 ही चोरल्याची सांगितले. तसेच एक हीरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल तिचा नंबर MH 14 BB 2133
हि टाटा मोटर्स कंपनी पिंपरी येथिल पाकींग मधुन चोरल्याचे कबुली दिल्याने त्याच्या कब्जातुन ०१ रिक्षा व ०१ मोटरसायकल असा एकूण १,६५,०००/- रुपये कींमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन गुन्हे शाखा युनिट ०२ कडुन दोन वेगवेगळ्या कारवाया मधुन
०३ दुचाकी व ०१ रिक्षा अशी ०४ वाहने २,२५,०००/- रुपये कींमतिचा मुद्देमाल जप्त करुन एकुण वाहन चोरीचे ०४ गुन्हे उघड करण्यात आले आहेत. सदरची कारवाई ही स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, पो.हवा. प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जयवंत राऊत, पो.ना. देवा राऊत, सागर अवसरे, स.पो.फौ. शिवानंद स्वामी, केराप्पा माने, दिलीप
चौधरी, पोना १९२३ आतिष कुडके, नामदेव कापसे, पोलीस शिपाई शिवाजी मुंढे, अजित सानप, उध्दव खेडकर यांच्या पथकाने केली आहे.



