महाराष्ट्रसामाजिक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंच पुणेचा मूंबईकरांना मदतीचा एक हात पुढे..

प्रतिनिधी- आंबेडकर नगर,आप्पा पाडा, मालाड, मुंबई या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली होती या आगीच्या दुर्घटनेत या परिसरातील जवळजवळ 5000 कुटुंबीयांची घरे जळून उध्वस्त झालेली आहेत, तसेच घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळालेल्या असून इथली बाधित कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आलेली आहेत. सरकारने मदत जाहीर केली, परंतु एक महिना उलटून गेला तरी अद्याप पर्यंत एक छदाम ही इथल्या नागरिकांपर्यंत पोचलेला नाही.
सामाजिक बांधिलकी जपत कर्तव्य भावनेतून “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंच, पुणे” च्या अध्यक्षा अश्विनी कांबळे व त्यांच्या सर्व सहकारी तसेच संविधान सन्मान समिती, पुणे यांच्या विशेष प्रयत्नातून रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी मालाड मुंबई येथील दुर्घटना स्थळी जाऊन स्त्रिया, पुरुष, लहान मुले यांना कपडे, साड्या वह्या, चप्पल्स, स्कूल बॅग इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या मदत कार्यास ॲडव्होकेटस सोशल फोरम पुणे. अध्यक्ष ॲड. जितेंद्र कांबळे, ऑल इंडिया एस.सी एस.टी रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन पुणे अध्यक्ष रवींद्र भाऊ कांबळे, तथागत प्रतिष्ठान पुणे, अध्यक्ष संजयभाऊ भिंगारे यांचे विशेष सहकार्य लाभले. या मदत कार्यास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंच पुणे, ऑल इंडिया बँक ऑफ इंडिया एस.सी एस.टी ओ.बी.सी असोसिएशन पुणे, युगी सामाजिक संस्था पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे अश्विनी कांबळे यांनी सांगीतले या पूढे बोलताना त्यांनी आभार मानतांना बोलल्या ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत वस्तू स्वरूपातील आपली मदत आमच्यापर्यंत पोहोचवली त्या सर्वांचे मनापासून शतशः आभार सामाजिक बांधिलकी जपत आपल्या सर्वांच्या मदतीचा हात असाच पुढे राहू द्या, धन्यवाद .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!