
प्रतिनिधी- संघटनेतील सर्व पदाधिकारी व सभासद यांना कळवण्यात येते की उद्या दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 :30 वा. अति महत्वाची मिटिंग बोलवण्यात आली आहे. तरी सर्वांनी न चुकता वेळेवर, आपापले काम सोडून दिलेल्या वेळेत हजर राहावयाचे आहे, कोणाचे कांही कारण ऐकले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, ज्यांच्या कडे मोठे मोबाईल नसतील त्यांना इतरांनी कल्पना देण्याची कृपा करावी .
दिनांक 27 एप्रिल 2023 वेळ सकाळी 11 : 30 वा.
स्थळ :- प्रा .बी .बी. शिंदे .(दादा )यांचे घरी. बालाजीनगर, भोसरी, पुणे 26.
विषय : रमाई आवास घरकुल योजना, मधील पात्र लाभार्थीना अनुदानाचे चेक वाटपाची योजना कशी राबवावी, याबाबत चर्चा..
तरी सर्वांनी वेळेत हजर राहण्याची कृपा करावी, आपल्या विचारा शिवाय या पुढे काहीच करता येणार नाही.या पात्र 37 लाभार्थ्यांन मधून आतां पाच लोकांचे सुद्धा चेक आम्ही काढून देण्याची शिफारस करू शकतो. त्यांचे चेक त्यांना मिळाल्यास, बाकीच्यांनी आपापले चेक ज्याचे त्यांनी काढावे लागतील, याचीही नोंद घेण्यात यावी. कारण या योजनेतील फार्म भरलेले 228 उर्वरित जे लोक आहेत, त्यांच्या साठी आम्हाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे लक्ष देता येणार नाही. म्हणून आपण वेळेत हजार रहावे. असे सर्व हारा उत्कर्ष, चिंतन समाज, सामाजिक संघटना ( महा. राज्य )चे सचिव मा. हरीचंद्र शिंदे यांनी सांगीतले.



