महाराष्ट्रशहरसामाजिक

भोसरी नुरमोहल्ला येथे ईद-ए-मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला..

प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड दि. २७ एप्रिल २०२३ रोजी फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच व शाह जमात शान ए फकीर फाऊंडेशन यांचे विद्यमाने भोसरी नुरमोहल्ला येथे ईद-ए-मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा उद्देश हाच की सद्यपरिस्थितीत जाती- जातीत, धर्मा- धर्मात विष पसरविण्याचे काम सुरू आहे. या सर्व जाती धर्मामध्ये एकोपा वाढावा तसेच मानवता हाच खरा धर्म ही भावना प्रत्येक माणसामध्ये निर्माण व्हावी हा उद्देश घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते महमंदभाई मुलाणी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे समन्वयक प्रा.किरण खाजेकर, मिलींद फडतरे, जामा मस्जिद भोसरीचे अध्यक्ष करीमभाई सय्यद, अभिनेते सुरेश डोळस, शिवसेना उपशहरप्रमुख राहुल गवळी, नईम शेख, अतहरभाई शाह, फिटनेस ट्रेनर अतुल चव्हाण, जहीर खान, मुन्नवर शाह, नईम शेख, पुष्पेंद्र नाईक, छत्रपती इंगोले, नाना डोळस, विजय ओव्हाळ, भगवान ओव्हाळ, अंकुश कांबळे, निजाम सय्यद, अदींनी एकोप्याचे दर्शन घडवत शिरकुर्माचा स्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच व सलोखा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हरिश डोळस, शाह जमात शान ए फकीर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहसीन शाह, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष तेजस गवई यांनी केले. नियोजित कार्यक्रम यशस्वी केला. असे हरिश डोळस यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!