विशेषशहरसामाजिक

अवैध शस्त्र बाळगणारा ०२ पिस्टल व ०४ जिवंत मॅगजिन सह सांगवी पोलिसांच्या ताब्यात..

प्रतिनिधी-सांगवी, दि. ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक एम. डी. वरुडे व पोलीस अंमलदार तसेच गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहा पोलीस निरीक्षक गणेश खारगे असे अवैध शस्त्र बाळगणारे व गोहत्या करणारे गुन्हेगारांची माहिती घेत होते.
दि.०२/०५/२०२३ रोजी गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहा पोलीस निरीक्षक गणेश खारगे,पो.ना. ११९४ विवेक गायकवाड, पो.कॉ. ३२०८ विशाल गायकवाड, पो. शि. २३६५ आकाश पांढरे, व सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील प्रमुख पोलीस उप निरीक्षक एम. डी. वरुडे, व तपास पथकातील पोलीस अंमलदार पोना/१५३४ प्रविण पाटील, पोना/१५३५ विजय मोरे, पो.कॉ/२२०९ सुहास डंगारे, पो.हवा.८५९ संजय डामसे असे संयुक्तीक रित्या सदर भागामध्ये पेट्रोलिंग करीत असताना
दि.०२/०५/२०२३ रोजी ०२.०० वा एक इसम रक्षक चौक ते पिंपळे निलख जाणारे रोडवर पायी चालत
जाताना दिसला सदर इसमाचे पाठीवर एक काळे रंगाची सॅक होती सदर सॅक मध्ये काय आहे, असे
विचारता तो रस्त्याचे डावे बाजुला असले झाडी झुडपात पळुन जात असताना वरील पोलीस स्टाफचे
मदतीने त्याचा पाठलाग करुन सदर इसमास दि. ०२/०५/२०२३ रोजी ०२.२० वा ताब्यात घेवुन त्याचे
नाव,गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता १) राम परशुराम पाटील वय २९ वर्षे रा.शिवशोभा
बिल्डीग जयमल्हार कॉलनी नं ६, थेरगाव पुणे मुळ गाव टाकळी, ता. उदगीर, जिल्हा लातुर, असे
सांगीतले त्याचे खांदयावर असले काळे रंगाचे सॅक मध्ये काय आहे असे विचारता तो उडवाउडविची उत्तरे
देवु लागला दोन पंचाना बोलावुन त्यांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात ०२ स्टेनलेस
स्टिलचे देशी बनावटीचे पिस्टल त्यास स्ट्रिगर गार्ड, मॅगजिन असलेले, व ०४ जिवंत पितळी (राऊंड),असा
मुद्देमाल मिळुन आला. सदर बाबत सविस्तर पंचनामा करुन मुद्देमाल जप्त करुन लेबल लावुन सिल करुन
त्यास सांगवी पोलीस स्टेशन येथे आणुन सखोल तपास केला असता त्याने त्यांचे कब्ज्यात ०२ स्टेनलेस
स्टिलचे देशी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत पितळी (राऊंड) अवैधरित्या बाळगले असल्याने त्याचे विरुध्द सांगवी पोलीस स्टेशन गु.र. नं २०४/२०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) (२७) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर आरोपीस अटक करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन अधिक कसुन चौकशी केली असता, सदर आरोपीने दि.२२/०४/२०२३ रोजी रावेत येथे चैन स्नॅचिंग केली
असल्याबाबत कबुली दिली आहे.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे मा.पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे साहेब, मा.सह पोलीस आयुक्त,डॉ.संजय शिंदे साहेब, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी साहेब,मा.पोलीस उप आयुक्त डॉ.काकासाहेब डोळे साहेब परीमंडळ ०२, सहा. पोलीस आयुक्त शश्रीकांत डिसले साहेब वाकड विभाग ,यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल टोणपे,
सांगवी पोलीस स्टेशन तपास पथकातील प्रमुख पोलीस उप निरीक्षक श्री. एम. डी. वरुडे, पो हवा ७३९ शिंदे, पो.हवा.८५९ संजय डामसे पोना/१५३४ प्रविण पाटील, पोना/१५३५ विजय मोरे, पो.ना.१५१२ गोडे,पो.कॉ/२२०९ सुहास डंगारे, पो.कॉ २०११ पाटील, पोकॉ २२१८खंडागळे, पोकॉ माने, पोकॉ.शिंगोटे,पो.कॉ लेकुरवाळे तसेच गोहत्या प्रतिबंधक पथकातील सहा पोलीस निरीक्षक गणेश खारगे, पो.कॉ.३२०८ विशाल गायकवाड,पो.शि.२३६५ आकाश पांढरे, पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!